...

1 views

शाळेचा विद्यार्थी
पुन्हा एकदा शाळेचा विद्यार्थी व्हावे...
शाळेतील आयुष्य नव्याने जगावे...

पुन्हा एकदा खोडकर मुलगा सिद्ध व्हावे...
शिक्षकांच्या छडीचा मार आनंदाने खावे....

छडी लागे छमछम विद्या येई घम घम हे साकार करावे...
पुन्हा एकदा शाळेचा विद्यार्थी व्हावे....
शाळेतील आयुष्य नव्याने जगावे....

मित्रांसोबतची मज्जा पुन्हा एकदा अनुभवावे..
धिंगा मस्ती करुन गोंगाट करावे..

पुन्हा एकदा मित्रांसोबत आनंदाने भांडावे...
त्याला चिडवून सतावून पुन्हा जगावे...

मित्र हाच सखा माझा स्वाभिमान बनवावे...
अन्न हे पूर्णब्रह्म म्हणून डब्यातील जेवण आत्मसात करावे...
पुन्हा एकदा शाळेचा विद्यार्थी व्हावे...
शाळेतील आयुष्य नव्याने जगावे..

शाळेतील पहिले दिवस पुन्ह आठवावे...
पुन्हा एकदा मित्रमैत्रिनींसोबत सैर करावे....

शाळेत प्रार्थना सुरू असताना मित्राशी गप्पा मारावे....
शिक्षकांचा राग आनंदाने अनुभवावे...

शाळेत उशिरा पोहचून शिक्षा म्हणून मैदानातील दौड पुन्हा आनंदाने करावे....
पुन्हा एकदा शाळेचा विद्यार्थी व्हावे...
शाळेतील आयुष्य नव्याने जगावे.....

हरपून देह भान शाळा सुटल्यावर गोंगाट पळावे....
किरकोळ कल्ला करत आनंदाने सुटावे...

पुन्हा एकदा शाळेतील मैदानात पडावे...
शिक्षकांचे जखमेवर ममतेने फुंकर घालने अनुभवावे..

शिक्षकांना बोरं कैरी पुन्हा न्यावे...
शाबासकीची थाप पाठीवर आनंदाने घ्यावे...
पुन्हा एकदा शाळेतील विद्यार्थी व्हावे...
शाळेतील आयुष्य नव्याने जगावे...

पुन्हा शिक्षकांसोबात मोठ्याने पाढे म्हणावे...
नवनवीन पाट्यांवर अक्षरे रेखावे...

गृहपाठ न करता शाळेत जावे....
शिक्षकांचे बोलणे आनंदाने ऐकावे...

होऊनी जणू फुलपाखरू या शाळेत पुन्हा जगावे...
आनंदाचे क्षण जीवनाचे प्रतिबिंब तुझेच तू अनुभवावे...
पुन्हा एकदा शाळेचा विद्यार्थी व्हावे....
शाळेतील आयुष्य नव्याने जगावे...

शाळेतील डान्स प्रोग्रॅम्समध्ये भाग घ्यावे....
शीक्षकांसोबत नाचणे पुन्हा अनुभवावे...

वेळ ही संपणारी कधी न कळावे...
आयुष्यातील प्रत्येक क्षण पुन्हा जगावे ....

शाळेतील आठवणी काढत काढत आता जीवन जगावे...
पुन्हा एकदा शाळेचा विद्यार्थी व्हावे...
शाळेतील आयुष्य नव्याने जगावे....

शाळेतील स्वर व्यांजंनांचा गजर पुन्हा एकदा करावे..
जणू देवी सरस्वतीचे भजनात हरपून जावे..

पाटीवर स्वर व्यंजनांची चित्रे पुन्हा रेखावे..
हसत खेळत शिक्षकांसोबत आनंदाने शिकावे...

जीवनातील खरा आनंद यातूनच अनुभवावे...
पुन्हा एकदा शाळेचा विद्यार्थी व्हावे....
शाळेतील आयुष्य नव्याने जगावे...

गणतंत्र दिवसानिमित्त आईकडून स्वतःला सजवून घ्यावे...
शाळेतील खाऊ चॉकलेट, बिस्कीट ची चव आनंदाने अनुभवावे....

शाळेत मराठीच्या पुस्तकातील कविता मोठ्याने म्हणावे...
कवितेतील त्या गाण्याच्या ओळीत हरपून जावे...

आठवावे रूप तुझे ते निरागस भाव ते शाळेत पुन्हा जगावे..
होऊनी पारिजातक त्या रात्रीच फुलवावे....

न हे सर्व क्षण जीवनाचे अंतिम इच्छा शक्य असेल तर ते पुन्हा जगावे...
पुन्हा एकदा शाळेतील विद्यार्थी व्हावे....
शाळेतील आयुष्य नव्याने जगावे....

हे सर्व क्षण जीवनाचे कधी न विसरावे...
आयुष्याच्या प्रवासात हे क्षण पुन्हा आठवावे...

तेव्हाचे ते जीवन आत्मज्ञानानं भरून जगावे...
जगून तर कधी त्याचा अर्थ कळणार नव्हें...

शाळेतील आयुष्य कधी न कळले हे जगले असावे...
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर हे क्षण आठवावे...

म्हणुन ईश्वर चरणी अर्पण एकच इच्छा करावी...
खरी ही जीवनाची किंमत तेव्हाच कळावी...

जगून तर घेता आले असते ते जीवन आनंदाने..
आता नुस्त आठवणींचे चिंतन करीत स्वतःला कोसने.

तरी कितीदा नव्याने जगावे...
प्रत्येक वेळी ते कमी पडावे...
पुन्हा एकदा शाळेचा विद्यार्थी व्हावे...
शाळेतील आयुष्य नव्याने जगावे....

~written by दर्शन बोंबटकार
 
© All Rights Reserved