...

6 views

राजा शिवबा


पाषा‌णाला ही पाझर फुटला,
सुर्य ही शांत झाला.
आणि १९ फेब्रुवारी १६३०साली,
शिवनेरीवर जिजाऊंचा वाघ जन्मला.

आई बहिणीच्या रक्षणास,
शिवबा मागे नाही हटला.
घातला अब्रू हात कोणी,
तो साला तिथेच छाटला.

जिथे शिवबाच्या घोड्यांच्या टापा पोहोचल्या,
तो मुलूख स्वराज्याचा भाग झाला,
अफजलखानाचा वध करून.
प्रतापगडचा राजा झाला.

नजर शिवाबाची तीक्ष्ण कावळ्यापरी,
पडली सिद्धीच्या जंजिरावरी.
त्यांनी केली नऊ वेळा स्वारी,
तरीही अपयश पडली पदरी.
म्हणून राजे होते का दुखा:परी ??

रयतेच्या कल्याणासाठी राजा शिवबा स्वता: झटले.
मायभूच्या स्वातंत्र्यासाठी रक्तात ही माखले .....

( कु. तन्वी सावंत )
१९ फेब्रुवारी २०२३