...

2 views

स्वातंत्र्य चळवळ
गोऱ्यांचे चाबुकांचे वळ पाठीवर उमटले,
तरी ही ते पिछे न हटले,
काहींचे रक्त ही सांडले
स्वातंत्र्याच्या चळवळीत टेच टिकले,
स्वातंत्र्याच्या चळवळीने काय काय झेलले.

लढा देण्यासाठी सारेच सज्ज झाले,
तरुणाईचे सळसळते रक्त मुक्ततेसाठी कामी आले ,
हे सारे पाहून इंग्रजांचे धाबे दणाणले ,
इंग्रजांचे काही चाले ना झाले,
स्वातंत्र्याच्या चळवळीने काय काय झेलले.

आंदोलकांनी उग्र रूप धारण केले,
सर्वांनी कायदे हाती घेतले,
आता मात्र इंग्रज धमक्या देऊ लागले,
पण भारतीयांनी चारही दिशांना लक्ष केले
स्वातंत्र्याच्या चळवळीने काय काय झेलले.

प्राण बेहत्तर,जीवाची गय नाही असे ठरवले ,
या प्रेरणेने सर्वांचेच बळ वाढले,
इंग्रजांचा नाईलाज झाला आणि म्हणाले,
"तुम्हारा तिरंगा तुम्हे मिलेगा!"
स्वातंत्र्याच्या चळवळीनेे काय काय झेलले.

या घोषणांनी सगळे आंनदी झाले,
अखेर भारतीयांचे सप्न पूर्ण झाले,
एकजुटीचा विजय होऊन प्रत्येकाला हक्क मिळाले,
स्वातंत्र्याच्या चळवळीनेे काय काय झेलले.

कु.तन्वी सावंत
( 20/12/ 2022)