...

6 views

माझा बाबा
रात्रीं उशीरा येतो,
पण घरासाठी जिवाचं रान करतो...
...तो असतो बाबा...
थोडंसं दटावतो,
पण परत स्वतःच प्रेमाने समजावतो...
...तो असतो बाबा...
काहीही हवं असल तर आधी नाही म्हणतो,
आणि हळूच सकाळी अाईकडे त्यासाठी पैसे ठेऊन जातो...
...तो असतो बाबा...
रात्री उशिरा घरी आल्यावर चिडतो, रागावतो,
पण रडवेला चेहरा पाहून खूप लाडाने हिच गोष्ट कशी चुकीची आहे हे समजून सांगतो...
...तो असतो बाबा...
स्वतः सुट्टी घेणार नाही फिरायला,
पण आम्हाला मात्र सहलीला पाठवतो...
...तो असतो बाबा...
कधी आजारी पडलं तर,
बापरे, किती काळजी करतो..
...तो असतो बाबा...
अग डॉक्टरकडे गेली का? काही खाल्ल का? औषध घेतल का? अश्या प्रश्नांनी फोन करून दिवसभर भंडावून सोडतो...
...तो असतो बाबा...
आईच्या प्रेमात माया असते,
पण जो काळजी करतो,
...तो असतो बाबा...
न दाखवता ही जो जीव लावतो,
न सांगता ही जो कळून घेतो,
न मागता हि जो सगळं घेऊन देतो,
...तो असतो बाबा...
...हो तो असतो बाबा...
ज्याच्यासाठी लिहायला शब्दही अपुरे पडतील,
...तो असतो बाबा...
...हो तो असतो बाबा...
तुझ्यासाठी काय आणि किती लिहावं रे बाबा, शब्द ही अपुरे पडतील,
म्हणूनच का रे सारे फक्त आईवर कविता करत असतील.