...

5 views

लेक वाचवा........
आग जन्म देणारी आई
मला येऊदे जगात बाई
का नको वाटते आज मी
उद्याच्या भविष्याची राणी जी,

जसा हवा वंशाचा दिवा घरी
मला ही स्थान द्या कुटुंबाच्या दारी
हो मान्य आहे मुलगा नाव कमावेल
माझ्या जन्माने तुमची मान उंचावेल

करेन मी ही जगी जगताना खूप कष्ट
आई लेक वाचवून ही परंपरा करूया नष्ट
तुही आई ह्या जगी एक स्त्रीच आहेस की ग
जन्माला घालताना किती सहण करतेस वेदना ग

लोकांचे काय ते तर टोमणे मारतच राहतात
त्यामुळे ह्या जगी जन्माला आलेली लेक मारतात
का अस करून घेता स्वतःवर तुम्ही अन्याय
आई बाबा लेक जगण्यासाठी कोणी देईल का न्याय

ह्या जगी आताच काय देवांच्या काळी ही क्षण साक्षात घडलय
लेक होऊनी मोठ्यापाणी तिझ्या अंगी वाघिणीचे रूप बहरलय
जगू दे आई ह्या जगी ग तुझ्या लेकीला आज ह्या सृष्टीवर
बदल आणायचाय मला वाईट विचार करणाऱ्या नजरेच्या दृष्टीवर

सगळ्यांच्याच येत नाही ग लेक जन्माचे स्थान पदराला
तुझ्या आले आई तर ठाम उभी रहा लेक वाचवायला
खूप झाले जगी आता नको हा विचित्र प्रकार सारा
शहाणे होऊन ह्या प्रतेला आता पूर्णपणे बंदी मारा

पदरी आलेले सुख आई असे नको ग दुःखात घालवूस
दुनिया काही म्हणेन तु त्यांच्या कडे खरच लक्ष्य नको वेधवूस,
आई बाबा असे का आलेले पदरी आनंदाचे घालवता सुख रे ,
अश्याने तर आईच्या काळजात तर कायमच राहतंय दुःख रे ...

जगू द्या ना मला ह्या जगी मी विनंती करते ग आज आई बाबा मनापासून तुम्हाला
मला इतिहासातील स्त्रीचे पराक्रम पुन्हा गाजवायचे आहेत तुझ्या पोटी येऊन जन्माला.....
© @Swa_hitkalambate 1044.

Related Stories