...

6 views

माळलेला गजरा
माळलेला गजरा
तिच्यावर प्रेम करायचा
लक्ष विचलित होऊ नये
म्हणून वारंवार समोर यायचा
कधी डोळ्यावर कधी गालावर
हळूवार चुंबन घेत जायचा
कोण पाहील यासाठी तो
लगेच आपली जागा घ्यायचा
कुणीतरी छेडायचा प्रयत्न केला
की सुगंध सोडुन सूकून जायचा
पण तिचा स्पर्श होताच हा वेडा
कोमेजला असताना ही टवटवीत दिसायचा..