...

5 views

बदल
मोकळीक मिळालीये त्या त्रासापासून
खूप काळानंतर
निर्जीवसारखं जगण्यापासून
मिळालंय थोडं अंतर

ह्या सुखलेल्या रोपाला पाजलय
कोणीतरी पाणी
जास्त बहरून निखरतोय
सुंदर नवीन फुलांनी

ध्येय जवाबदऱ्या सोडून ह्या आधी
नव्हते कोणतेही उद्देश
सुंदर आयुष्य जगण्यासाठी कोणीतरी
देऊ लागलय संदेश

बदलू लागलीये वेशभूषेतील हालचाल
बदलू लागलीये बोलीमधली वाणी
हर एक जण आतुरतेने विचारतो मला
हा बदल तुझ्यात घडवला तरी कोणी

ज्याने कोणी घडवला हा बदल
मानतो मी त्याचे आभार
त्या मुळेच सुधारलिये माझ्या जीवनातील
भरकटलेली वाटचाल

खूप आनंदात असतो मी म्हणून तर
दिसते चेहऱ्यावरती हास्य
ह्या आधी अश्या किरकोळ मनावर
कधी केलं नव्हतं कोणी भाष्य

ह्या अचानक पडलेल्या पावसाने
भिजवले मला नक्की
इतर कारणासाठी नाही तर तो फक्त
पडतोय माझ्यासाठी

© All Rights Reserved