...

1 views

अंतरंग
काळीज उलतांना, मज कितीसे तरंग मिळाले
उगा शोधता मी शांती, मज अंतरंग मिळाले !

न ठावे कुणा कश्याने, ते शांतीचे विश्व मिळाले
न जाणे कुठून कसे ते, विश्वजित अश्व मिळाले !
©®@Devideep3612
जात्याच मजला माझे, कितीसे अनुबंध मिळाले,
भलतेच तुटले होते, तेच ते संबंध मिळाले !

कुणास ठावे मी उगाच, काय ते उजळीत आहे ??
कितीही विझविले तरीही, सत्य जळजळीत मिळाले !!

नको असे हे भास आता, कुणास काय छान मिळाले ??
'देविदिप' जे दिले देवाने, मानून घे ते वाण मिळाले !!
©®@Devideep3612