...

4 views

दिवाळी

हेल्दी रामचे बेसन लाडू
भाकरवडी हळूच वाढू
अमूलचे तर तुंप संपले
सोनाईनेही रचले इमले

अमेझाॅनची पब्लिसिटी
ऑफरची तर चंगळमोठी
फ्लिपकार्टने मारली बाजी
डिमार्टवर तर ताजीभाजी

संपले श्रम सनासुदीचे
यंत्रवत जगणे आनंदाचे
कंपनीचे सुगंधी उटणे
त्वचा काळवंडे लावणा-याचे

आकाश कंदील प्लास्टिकचे
नकोच श्रम हात डोक्याचे
इलेक्ट्रीकचे ते एचडी लॅंप
वाईनचे तर सणातही कॅंप

थंडीविना सजली दिवाळी
पाऊस धारांत चिंब दिवाळी
थकला चातक पिऊन पाणी
कुठे हरवली कोकीळ गाणी?