...

15 views

❤️आई - बाबा❤️
❤️आई - बाबा❤️
आई ने सांगितल्या बालगीतांच्या संगतीने गोष्टी
पण बाबांनी दिली मला धैर्य आणि शौर्याची पुष्टी ........
आईनी दिला शिक्षणाचा धडा पण
बाबांनी दिला स्वाभिमानाचा भरलेला घडा .....
आईनी दिले संस्कारातून मोती तेव्हा बाबांनी
पेटविली अंधकारातून ज्योती.....
आईच्या मायेची सर न कुणाला पण बाबांच्या पराकाष्टेची झळ लागे मनाला ......
आईची सानुली मी पण
बाबांच्या आशेची किरण मीच झाली........
आईनी गिरवले ज्ञानाचे अक्षर अन
बाबांनी बनवले मला साक्षर .......
आईनी भरवला घास प्रेमाचा अन
बाबांनी उचलला ध्यास सामर्थ्याचा .....
आईनी गुंफले मज फुलासारखे सुंदर
बाबांनी समजवला मज स्वातंत्र्याचा आशय..
आईच्या स्पर्शाने सारे दुःख मिटायचे बाबांच्या कष्टानी प्रगतीचे मार्ग मिळायचे.....
आईनी दिली बाहुली पण
बाबांनी शिकवली स्वरक्षणाची कवायत खरी.....
निर्भीड विचार समतेचे आईचे ..
स्वप्न साकारू पाहते शिस्तप्रिय बाबांचे .....
लाटणे हाती घेता चटका लागे म्हणे आई, बाबा मात्र माझे बुद्धिबळाचे कौशल्य विकसित करू पाही.....
न्यायाने तू लढा दे म्हणते आई
अन्यायाला वाचा फोड
बाबा म्हणतात असे काही...
रणांगणातील रणरागिणी तू
शांतीची तू साक्षी
आईसारखी सर्वगुणसम्पन्न
पण बाबांसारखी शूर तू
इथे कर्तृत्वाची मिसाल लावी......✍️
Writer-Mansi
#aaibaba!❤️
#momdad #marathistatus # #baba #motovational_quotes #inspiration #inspirational #inspirationalquotes #writco
© M@ñsî
© Mansi