माझी माय
माझी माय ग माय,
जीव लावती ग लय...!
गगनात मावत नाय
एवढी लावते माझी ग माय....!
तिच्या चेहऱ्यावर आनंद भारी असतो,
अन् काही वेगळाच दिसतो
स्वतःचे डोळे मिठेपर्यन्त
जीवापाड प्रेम करते ती असेपर्यंत....!
माझी माय आहे फुलांचा बगिचा,
अन् मखमली प्रेमाचा गालिचा
भरभरून वाहतो मायेचा पाझर
तिच्याजवळच असतं सुखाच कोठार....!
आपल्या सुखासाठी मर मर मारते,
उपासी राहून घासातील घास भरवते....!
वेळ आली स्वतः राहीन उपाशी
पर लेकरा खावू घालीन तुपाशी....!
माझी माय
मनिषा मिसाळ ( लोखंडे)
जीव लावती ग लय...!
गगनात मावत नाय
एवढी लावते माझी ग माय....!
तिच्या चेहऱ्यावर आनंद भारी असतो,
अन् काही वेगळाच दिसतो
स्वतःचे डोळे मिठेपर्यन्त
जीवापाड प्रेम करते ती असेपर्यंत....!
माझी माय आहे फुलांचा बगिचा,
अन् मखमली प्रेमाचा गालिचा
भरभरून वाहतो मायेचा पाझर
तिच्याजवळच असतं सुखाच कोठार....!
आपल्या सुखासाठी मर मर मारते,
उपासी राहून घासातील घास भरवते....!
वेळ आली स्वतः राहीन उपाशी
पर लेकरा खावू घालीन तुपाशी....!
माझी माय
मनिषा मिसाळ ( लोखंडे)