...

1 views

प्रिय बाबा
प्रिय बाबा,

त्रिवार अभिवादन. सर्व प्रथम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. मी..! सोनाली. तुम्ही घडवू पाहणाऱ्या लोकशाही प्रधान देश्यातील एक सामान्य मुलगी. बाबा तुम्ही आमची ओळख आहात आमची प्रेरणा आहात. जगायला शिकले ते तुमच्या संघर्षामुळेच. तुमच्या विचाराने, तुमच्या प्रयत्नाने तळागळातील माणसाना माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळाला. माझ्या सारख्या किती तरी मुली आज बोलत्या झाल्या लिहित्य झाल्या. अर्थात त्याचच फलित म्हणून मी आज तुम्हाला हे पत्र लिहीत आहे. कारण तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्राम वर नाहीत ना..! तिथे तुम्ही असता तर मेसेज केला असता बघा. पण बर झाल नाही ते. मलाही इनबॉक्स उघडावास वाटत नाही. बाबा तुम्ही आम्हाला जगाला प्रेम आणि मैत्री शिकवणाऱ्या जगत वंदनीय बुद्धाची ओळख करून दिली पण तो बुद्ध इथल्या मुलांना आणि पर्यायाने इथल्या समाजाला सुद्धा समजला नाही किंवा त्यांना तो समजून घेण्यासाठी वेळ मिळाला नाही अस आपन म्हणू..! हल्ली इनबॉक्स मध्ये हेतु पूर्वक टाइम पास करण्याचे आणि शिरीरसुखाची अपेक्षा ठेवणाऱ्याचे अशलीन मेसेज जास्त असतात. म्हणून आता किळस येते आहे त्या समाज माध्यमांची. असो
बाबा ऑफिस मधून घरी जाण्यासाठी ऑटो ने रोजचा प्रवास असतो. पण ऑटो मध्ये भीमगीत वाजवणारे आणि वाघांच काळीज असणारे भीमपुत्र आणि शिवपुत्र समोरच्या आरशयातून नजरेनेच काळजाचे लचके तोंडतात. अर्थात अस भोगणाऱ्या मुलीनं मध्ये मी पहिली नाही आणि शेवटची ही नसेल. बाबा सगळ्याना अशा गोष्ट खूप सहज वाटततात. त्यामुळे आयुष्यच नकोस वाटू लागल आहे. पण मी घरी येई पर्यन्त मोकळा...