...

2 views

तू आणि मी
मी खूप सुंदर दिसतीये 😊दिवसातून मी खूपदा आरसा पाहते, कारण मला मलाच निराखून पाहण्याची इच्छा होतीये ✨माझ्याकडे माझ्यासाठी वेळच नव्हता. बोलायचं झालाच तर अगदी तसंही नाही पण पूर्वी मी तुज्याच विश्वात रममान असायचे. स्वतः ला विसरून मी तूज्याकडे नुसती पाहत बसायचे. तुझ कुठल्यातरी वळणावर दिसणं आणि माझ थांबून तूज्याकडे पाहत बसणं हा एक खेळचं झाला होता जणू काही 🙂तुजी आणि माजी आता फारशी भेट होत ही नाही, मी तुज्या पाहण्यात तर होते पण मी तुजी मैत्रीण नव्हते ही खंत मला अधून मधून वाटत राहते 😭माज्या आठवणीत तू खूप सुंदर आहेस माणूस म्हणून,फक्त तू माज्या जवळचा नाहीस. निरागस होत माज एकतर्फी प्रेम.जिथं जिथं तू दिसलास तिथे तिथे पुन्हा पुन्हा जायची इच्छा होते.तो क्षण पुन्हा जगावंसं वाटतो आयुष्य जगताना एक डाव हरल्या सारखं वाटत. हवं असणार कोणीतरी आपल्या सोबत नाही याची उणीव सतत भासत राहते. कल्पना विश्वात तू माज्या कायम सोबत आहेस पण वास्तवात तू नाहीस हे सत्य मी स्वीकारलय.
© anika