...

7 views

साप आला आणि माणूस मेला
आमच्या गावात त्या दिवशी भूत दिसलं, साधंसुधं नव्हत अती भयानक असं भूत होतं. अनेकदा माणसाला मिळालेली त्याची कल्पना करणारी शक्ती ह्या अशा भुतांच्या निर्मिती ला कारण ठरून जाते. हे भूत म्हणजे वैचारिक भूत.

सखाराम शेतातून थकला भागला आला. बाबा आलेले बघताच त्याचा मुलगा धावत धावत आला, बाबांना घट्ट मिठी मारली. इवलासा प्रतीक त्याच्या बाबाच्या मांडीवर बसला आणि आज शाळेत काय काय शिकवलं त्याबद्दलची चर्चा सुरू झाली. लाडे लाडे प्रतीक गुरुजींनी शिकवलेली कविता बाबांना म्हणून दाखवत होता, प्रतीकचा गोड आवाज ऐकून दिवसभराचा सगळा त्रास सखाराम विसरून गेला.

प्रतीक पुढे सांगायला लागला,"माहित आहे बाबा आज गुरुजींनी आम्हाला नवीन प्राण्याबद्दल सांगितलं, तुम्हाला माहित आहे त्याचे पाय सुद्धा नसतात आणि तो सरपटत सरपटत जमिनीवर चालत असतो. तुम्हाला माहित आहे जेव्हा तो चावतोना तर दोन बिंदू पडतात, आणि त्याचं विष हळूहळू माणसाच्या अंगात पसरते आणि तो माणूस मरून जातो. त्याला साप म्हणतात बाबा."

" हो का रे सोना,भयानक दिसतोय हा साप तर" सखाराम प्रतिकशी गप्पा मारत म्हणाला.


दुसऱ्या दिवशी सखाराम नेहमीप्रमाणे शेतात काम करत होता. अचानक झाडा मागून आवाज आला,सखाराम नी त्या दिशेने बघितले तर बघतो काय एक भला मोठा साप त्याच्या दिशेने सरपटत येत होता. सापाला पाहून सखाराम चे हात पाय थरथर कापायला लागले, त्याला माहीत होतं की प्रत्येक साप विषारी नसतो, मात्र सापाला समोर बघून त्याला धडधडायला लागलं, सगळं विसरून गेला लक्षात राहिला तर एवढच कि साप येणार मला चावणार आणि मी मरणार.

आणि याच धास्तीने सखाराम च्या डोळ्यासमोर अंधारी आली बघता बघता त्याच्या वैचारिक भुताने त्याच्या मानगुटी चा चांगलाच चावा घेतला होता. साप तर त्याच्या दिशेने निघून गेला, मात्र साप मला चावणार आणि मी मरणार या भीतीनेच सखाराम चा मृत्यू झाला.


म्हणून मित्रांनो कल्पना करण्याची शक्ती तुम्हाला सुंदर गोष्टींची निर्मिती करण्यासाठी मिळालेली आहे, तुमच्या आयुष्यात नवनियता आणि मज्जा सदैव टिकून राहावे हा त्यामागचा हेतू. तुमच्या कल्पनेतील विश्वामध्ये तुमच्या पंखांना नव बळ देण्याचं सामर्थ्य आहे त्याचा उपयोग योग्य पद्धतीने करा. आणि सखाराम सारखं अशा वैचारिक भुतांना बळी न पडता त्यांना पिटाळून कसे लावता येईल याचा नक्कीच विचार करा. नाही तर, 'साप आला आणि माणूस मेला' अशी गत व्हायला वेळ लागणार नाही.😂

© All Rights Reserved
© drowning angel