...

8 views

स्वातंत्र्य - स्त्रीचं आणि पुरुषाचं... ✍
स्वतंत्र...! खरं तर ही खूप पुढची पायरी झाली...! स्वतंत्र नक्की कशापासून हवं आहे आधी हे समजावून घेणे महत्वाचे आहे...! याची सुरुवात होते घरापासून आणि शेवट होतो समाजात राजरोसपणे बोलल्या जाणाऱ्या काही वाक्यांपर्यंत जाऊन... आपण आधी घरापासून पाहूया... जन्म होतो तेव्हाच सुरवात पेढे नाही तर जिलेबी वाटून तोंड गोड केलं जातं. अर्थात याला काही अपवाद आहेतच पण याचही प्रमाण कमी आहे. राहण्याच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या, मुलासाठी आणि त्याच घरातल्या मुली साठी हे सगळेच नियम वेगळे यात थोडीफार शिथिलता असू शकते पण समानता खूप कमी प्रमाणात दिसते.
कुठे तीची जमिनीशी तुलना करत तीच आई होणंच तिच्या अस्तित्वच आणि पूर्णत्वाच प्रमाण मानलं जातं, कुठे तिने एकट स्वतःच्या हिंमतीवर राहणं ही संकल्पनाच समाज बाह्य ठरविली जाते, कुठे तर घरात असलेली मुलगी घरची इज्जत तर तेच रस्त्याने चालताना समाजाची प्रॉपर्टी बनते याचा थांग पत्ता सुद्धा कुणाच्या मनाला शिवत नाही. लग्न म्हणजे आपली संस्कृती, परंपरा आहे जी आपण जपत आलो आहोत पण तिच मन जपण्याची धडपड कुणालाच नसते. अस का...? तिच्या त्यागाचा कौतुक होत पण हा त्याग करण्याच्या आटापिटा करण्यात तिच्या शरीराचं, स्वप्नांच, मन आणि मनातल्या सगळ्या भावनांचं कंपोस्ट खत होत याकडे कुणाचं लक्ष का नसत ?
करियर करण्याच्या नादात मुलीच वय वाढत वय वाढल की शरीरात काही स्वभावीक अपेक्षित बदल होतात तसेच पुरुषांतही होतात. पण त्याला चांगली जोडीदार मिळते आणि ती मिळावी ही अपेक्षा असते. पण हेच मुलीच्या बाबतीत असत का...! तर उत्तर स्वभावीक 'नाही' असाच येत. बस मध्ये महिलांसाठी सीट राखीव असतात त्यावर पण आपण खूप जणांची चांगली वाईट मत ऐकतो वाचतो. मग प्रश्न असतो त्या जागा राखीव असाव्या की नाही याचा...! जर नाही म्हंटल तर मासिक पाळी असतानाच्या वेदनांच काय होईल...? काही महिला वर्ग असा आहे ज्याच्या वाटेचे कष्ट कधीच संपत नाहीत ज्या गर्भारपण असताना सुद्धा प्रवास करतात त्याच काय...? जर यापैकी आपण अस समजू की कोणतीच समस्या स्त्रीला नाही म्हणून माणुसकीच्या नात्याने ती तिची राखीव जागा एखाद्या गरजू पुरुषाला देईलही; पण उभ्याने प्रवास करत असताना तिच्या दिशेने जी नजर आणि हाथ वळतील त्याच काय...? आता तेच पहा ना... या सगळ्या बद्दल बोलणारी मी...! स्त्री सबलीकरण, स्त्री पुरुष समानता, स्वतंत्र या सगळ्या विषयी लिहिताना 7 च्या आतच ऑफिस मधून घरी पोहोचणार आहे. स्वतंत्र वैगेरे काही नाही हा सगळा मानसिकतेचा खेळ आहे. खरंतर या सगळ्यांबद्दल बोलताना आमचा महिलावर्ग गोंधळात आहे की त्यांना नक्की कश्या पासून स्वतंत्र हवं आहे. त्यांना नक्की समानता हवी आहे की स्वतंत्र...!
अशे एक नाही हजारो मुद्दे आहेत जे लिहायला बसले तर लेख नाही तर एक पुस्तक लिहिले जाईल. खरंतर कुणाला किती स्वतंत्र आहे, कुणाला किती बंधनात राहावं लागतं, कोणाला काय वाटत, कोण कश्या कश्या समस्यांना सामोर जातो या पेक्षा आपण या समाजात समता कशी निर्माण करू शकतो यावर विचार व्हावा. कितीही केलं तरी सुरुवात स्वतः पासून करावी लागते. फक्त स्त्री किंवा फक्त पुरुष याचा समाज बनत नसतो. त्यासाठी दोघेही तितकेच महत्वाचे असावे लागतात. स्त्री ही माणूसच असते आणि पुरुषही...! फक्त गरज आहे माणसाची व त्यांच्या निवडीचा आदर करणाची...! आजच्या या समाजात ना पुरुष स्वतंत्र आहे ना स्त्री..! जस काही समस्येला आम्ही स्त्रिया सामोऱ्या जातो तश्याच पुरुषांच्या सुद्धा अनेक समस्या आहेत. जस की पुरुष आपल्या मुलांवर ममता करू शकत नाही, ते ही रडून मन मोकळं करू शकत नाही, ते त्याच दुःख व्यक्त करू शकत नाही, त्यांना इतरांचं भविष्य स्टेबल करण्यासाठी स्वतः तितकं सक्षम व्हावं लागतं...! म्हणून कदाचित आत्महत्येच आणि हार्ट अटॅकच प्रमाण पुरुषांमध्ये जास्त आहे.
म्हणून स्वतंत्र नंतर आधी समानता प्रस्थापित होणं ती इथल्या मातीत आणि मानसिकतेत रुजवल्या जण खूप महत्त्वाचं आहे...! मग इथे कुणीच बंदीस्थ नसेल आणि कुणाला स्वातंत्र्याची मागणी करण्याची आवश्यकता सुद्धा भासणार नाही...!
*सोनाली आहिरे*....✍️