...

2 views

ही कुठली अपेक्षा ..?
ही कुठली अपेक्षा ..?
कुठल्या आशा अपेक्षांच ओझ आपण सोबत घेऊन जगतो आहोत ? म्हणजे आपल्याला प्रत्येक नात्याकडून असलेली अपेक्षा. जी आपण समोरच्याला नेहमीच बोलून दाखवतो. पण प्रश्न असा आहे की आपल्याला ही अपेक्षा नेहमी बोलून का दाखवावी लागते ? जर या सगळ्या आशा अपेक्षा समोरच्याला न सांगता समजल्या तर ? आपण का ही अपेक्षा बोलून दाखवावी की कुणी आपल्यासाठी काही तरी कराव..! त्याला स्व मनातून ही जाणीव झाली तर ? तर आयुष्य किती सुंदर होईल नाही का ? आणि ही जाणीव नाही झाली तरी असा फारसा काही फरक पडणार नाहीये. आयुष्य आणि वेळ कधी कुणासाठी थांबली आहे का म्हणून ती आपल्यासाठी थांबेल. त्या पेक्षा हेच बर नाही का की आपणच समोरच्या व्यक्तीला विचार करण्यासाठी वेळ द्यावा. त्याला ही विचार करू द्या. अभिव्यक्त होऊ द्या. वेळ लागेल हे खर आहे पण निदान तुम्ही त्याच्या स्व जाणिवे मध्ये भागीदार नसणार. या आशा, अपेक्षा माणसाला जगण्याची आस जरी देत असल्या तरी त्याच...