...

1 views

मुलगा
जेव्हा जन्मतो तेव्हा वंशाचा दिवा झाला ,
असा जागर होतो , पेढ्याची श्रेणी वाटू लागते ,
तेव्हाच सर्वत्र आनंद पसरतो ,
अन् आई वडिलांना आधार येतो ...

लहानपणापासून लाड पुरविले जाते ,
गरीबी असली तरी काही कमी नाही ,
पोर मोठं होऊ लागतं,
बाप स्वतचं विचार करणं सोडून देतो ...
पोराच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो ..

परिस्थिती नसते म्हणून ताई च शिक्षण थांबत ,
हुशार असूनही लग्न लावून दिलं जातं ,
गरीबी फार वाइट असते ..

पोरगा लय हुशार निघतो ,
शेतकऱ्यांचं पोर ते कष्टाची जान असणारच ,
मॅट्रिक झाला पास आता पुढं काय ,
मग बाहेर शिकायचं पैसा तर लागणारच ...

तेव्हा कमवा अन् शिकवा ,
योजनेत केले काम ,
पोट नवत भरत पण आईच फाटका पदर ,
बापाची चप्पल बघताच,
मनाला लागली आग ,
काहीतरी शिकून मोठं व्हायचा ,
असा लागला मनी ध्यास ...

बापाचं झालं वय ,
दिदीला करत होते जाच ,
कधी एकदा नोकरी लागेल ,
अन् आई बापाला मिळेल आधार ,
हाच जगण्याचा ध्यास .....

Rajnandini lomate ....