
4 views
भेळ
भेळ
जीवन असले शुष्क जणू की
शुभ्र चिरमुरे नाजूकसे
जावे रंगून चवीत साऱ्या
चटपटी ओल्या भेळ सारखे . . !
फरसान ...नव्या जुन्या स्मृतींचे
गरजे पुरते काढून घ्यावे
पातेल्यातल्या जगण्यावर मग
हळूच सारे पसरून दयावे....
कांदा थोडा बारीक चिरता
अश्रूंनाही वाहून दयावे
बऱ्या.. वाईट .. सुखदुःखाचे
थेंब अलगद टिपून घ्यावे....
थोडे खट्टे . .. थोडे मिठे
अनुभव तिख्या चटणीचे
स्विकारावे हसतमुखाने
झणके बारीक मिरचिचे...
नसे पुरेसे जिन्नस तरीही
असे नसे ते मिसळून घ्यावे
न्यून पूरते घ्यावे करूनी
घासा घासां आनंदे खावे.... !
... शिव पंडित
© शिव पंडित
#life #marathikavita #fastfood
जीवन असले शुष्क जणू की
शुभ्र चिरमुरे नाजूकसे
जावे रंगून चवीत साऱ्या
चटपटी ओल्या भेळ सारखे . . !
फरसान ...नव्या जुन्या स्मृतींचे
गरजे पुरते काढून घ्यावे
पातेल्यातल्या जगण्यावर मग
हळूच सारे पसरून दयावे....
कांदा थोडा बारीक चिरता
अश्रूंनाही वाहून दयावे
बऱ्या.. वाईट .. सुखदुःखाचे
थेंब अलगद टिपून घ्यावे....
थोडे खट्टे . .. थोडे मिठे
अनुभव तिख्या चटणीचे
स्विकारावे हसतमुखाने
झणके बारीक मिरचिचे...
नसे पुरेसे जिन्नस तरीही
असे नसे ते मिसळून घ्यावे
न्यून पूरते घ्यावे करूनी
घासा घासां आनंदे खावे.... !
... शिव पंडित
© शिव पंडित
#life #marathikavita #fastfood
Related Stories
6 Likes
0
Comments
6 Likes
0
Comments