6 views
मृत्युंजय..... !
मृत्युंजय..... !
स्वातंत्र्याच्या समर प्रांगणी, सर्वस्व अर्पिले ज्यांनी
बलिदानाची, समर्पणाची , आहे अमर कहाणी...
प्रगाढ बुद्धि, अतुल्य साहस , तेजपुंज वाणी
पराक्रमाची, रचीली गाथा, वीर सावरकरांनी....
मित्र मेळा , अभिनव भारत , क्रांतीच्या ज्वाला
जॅक्सन , कर्झन केले मर्दन गेले यमसदनाला ..
फिरंगीयांच्या प्रांगणात, त्यांनाच दिली ललकारी
शस्त्रास्त्राने त्यांच्याच मारीले, त्यांचेच ब्रिटीश अधिकारी...
काळे पाणी ,जन्मठेपती, शिक्षा अति अघोरी
उडी मारूनी ,सिंधू तरुनी, गेला वीर किनारी....
त्या वीराचे हाल पाहुनी , थरारली कोठडी
मुलाबाळांचे आबाळ इकडे संसाराची होळी..... !
क्रांतीकारी कुलपुरुष हा ,तरी कधी ना डगमगला
मायभूमीला स्वतंत्र करण्या, पुन्हा लढण्या अवतरला.....
काव्य रचूनी , स्फूर्ती गीतांनी पुन्हा वणवा पेटवला
शब्द शब्द शब्दास्त्र होऊनी , शिरसंधान शत्रूचा केला......
स्वधर्म रक्षक , भाषा अभ्यासक , प्रचंड देशाभिमानी
त्रिवार वंदन हे मृत्यूंजय, तुजला दोन्ही करांनी !
© शिव पंडित

Related Stories
4 Likes
0
Comments
4 Likes
0
Comments