...

45 views

तुझे माझ्या आयुष्यात येणे...
प्रत्येक चिखलात
कमळ उगवत नसते...
आणि प्रत्येकाच्या
नशिबात तुझे येणे नसते...

प्रत्येक प्रवासात
सिट रिकामे नसते...
आणि प्रत्येकाच्या
आयुष्यात तुझे येणे नसते...

प्रत्येक मिनिटात
तुझी भेट नसते...
आणि प्रत्येकाच्या
वेळेत तुझे येणे नसते...

प्रत्येक नात्यात
तुझी ओढ नसते...
आणि प्रत्येकाच्या
हृदयात तुझे येणे नसते...

प्रत्येक सुरात
प्रेम गीत नसते...
आणि प्रत्येकाच्या
मैफिलीत तुझे येणे नसते...

प्रत्येक भावनात
तुझे विचार नसते...
आणि प्रत्येकाच्या
मनात तुझे येणे नसते...

प्रत्येक श्वासात
तुझी आठवण असते...
आणि फक्त माझ्याच
आयुष्यात तुझे येणे असते...

{Poonam}🖊️