...

2 views

कसा रे तु सखा असा !
न सांगता शांत राहू नकोस
कारण समोरा समोर मी
तुला बघू शकत नाही,
किरकोळ कारणाने
माझ्यावर रुसत जावू नकोस
कारण माझे मन तुझ्यातच मग्न काही.

तुझे काही बोल मनाला लागतात
तुला न कळत पण
खरंच माझे डोळे पाणावतात
माझा सर्वात खास असा सखा आहेस तू
मग मला दुखाच्याच प्रसंगी परके करणार का?
तुला माहित नाही इतक्या वेळेस आठवले तुला
पण त्या गोष्टींचा पुरावा देता येणार नाही मला,
शब्द घाव देतात पण, न बोलणे माणसाला आतून
मारून टाकतात