...

7 views

तोची भाग्यवंत
काय वाट्टोळं करणार कोण आपलं?
वाईट बोलून, अनं करून,
काय भलं होणार आपलं...

लागतीलही शाप, होईलही सर्वनाश,
जगण्याचं नं राहीलं अप्रूप..
मरणाचं भय मला नं वाटलं...

जरी होईल सारं शेवटी माझं शुन्य,
राहील भगवंत मनी तो..
होईन मी विलीन त्या अनंती धन्य...

जगण्यास तोची करतो चेतन,
मरणासही तोची करतो सधन..
शिकण्याचंही तोची एकमेव साधन...

देणाराही तोची खरा दानशूर,
घेणाराही तोची सारे कलंकही नाशवंत..
करणारा योग्य कर्म मानव.. तोची भाग्यवंत...

© Prasad Thale
Insta: ananta.speaks
#digital
#poetry
#poem
#marathi
#marathikavita
#marathipoems
#marathibana
#inspirational
#writco
#writcoapp