...

4 views

श्रीमंतयोगी..
अग्निहोत्रात अर्पिता पूर्णाहुती 'अहं' ची
भस्मातुनी दिसे वाट उज्ज्वल भविष्याची..१

अग्निपंखा समान पुन्हा झेप घ्यायची
खुणावते ध्येयवेदी ती उत्तुंग शिखरांची..२

अभंग राहते सदैव दीपमाळ कवड्यांची
का आस मनाला क्षणभंगुर पोचपावतीची..३

झिजल्याशिवाय न कळे महती चंदनाची
ही वेळ क्षणक्षण दायित्व निभावण्याची..४

शोधून खाण कटिबद्ध एकनिष्ठ मनांची
कार्ये रचावी रास मृत्युंजयी मौक्तिकांची..५
© ishanya