...

3 views

स्वप्नांची राणी
सुंदर राणी ओढ्याकाठी;
मधुर मिलन गाठीभेटी.
प्रिय सखी तू माझ्याभोवती,
खेळत होती लपाछपी;
ही नयनांची नातीगोती;
सफल होतील आपल्या भेटी.
हिरवी रानी चोहिकडे,
तुझी लाली जिकडे - तिकडे .
येता श्रावण महिना जेव्हा;
खुलते नयनाची पाकळी तेव्हा.
तुझीच सुंदर स्वप्ने पाहतो,
वेळ घालवतो तुझसाठी हा.
गोड चुंबने तुझीच घ्यावी,
ओठावरची लाली प्यावी.
तुझीच आस मती बांधावी,
तुला करावी स्वप्नांची राणी.


© ashwmegh