...

2 views

माणसाने माणूसपण हरवले
बेधुंद स्वप्नाच्या रिंगणात
गिरक्या घेता आठवले
अथक कर्माच्या जगात
माणसाने माणूसपण हरवले .....

यश अपयशाच्या डावात
यशाने हुलकावले
यशाला शोधता शोधता
माणसाने माणूसपण हरवले.....

सुख दुःखाच्या फेऱ्यात
सुख झाले थोडे
दुःखाच्या पर्वताखाली
माणसाने माणूसपण हरवले.....

आपुलकीच्या वनात
तुझ माझ करण्यात
आयुष्य पडले थोडे
आपली नाती निवडता निवडता
माणसाने माणूसपण हरवले....

या गुंतागुंतीच्या जाळ्यात
सगळेच गुंतत गेले
गुंता सोडवता सोडवता
माणसाने माणूसपण हरवले