...

2 views

लेखणीतून
दिस मावळता आला
सांज काळी काळी झाली
गुरं ढोरांनी आपल्या
वाट घरची धरीली !!

नागमोडी वळणं घेत
नेते घराकडे वाट
सांजेचा सूर्यनारायण
जणू कुबेराचा थाट !!

पिढ्या पिढ्यांचे टुमदार कौलारू घर
संग ढोरांचो महाल
तुळशीचे वृंदावन
भासे स्वर्ग ही लहान !!

उकड्या तांदळाची पेज
आणी खाऱ्याचो तुकडो
पाठी पडली पंचपकवान
असो आमचो कोंकणी थाट !!

नाल, सुपाऱ्यांची रास
आंब्या, फणसांचो वास
गाठीक असतोच सदा
काजींचो नवो पैसो !!

रानवाटा आणी सुगंध मातीचा
नदीतले सुरु आमच्या आयुष्याचा नूर
सह्याद्रीच्या खुशीत उमेद घेतो
माझा कोकण ऐट दाखवतो !!
© सुशांत