...

3 views

आयुष्यात.......
आयुष्यात
कोणत्या ना कोणत्या
कारणांनी या विनाकारण
संकटांना तोंड द्यावं लागतं.....
कधी कधी शारीरिक तर
कधी मानसिक
अन्
कधी सामाजिक तर
कधी नैसर्गिक
या बरोबर
कधी आर्थिक तर
कधी भौतिक
आयुष्यात
कुठली ना कुठली
स्थिती अन् परिस्थिती
उद्भव होतच असतं.......
काही समस्या तर
काही तक्रार
अन्
काही वैचारिक तर
काही अनैतिक
अशातच
काही आनंदमय
तर नैराश्य
आयुष्यात
कसलं ना कसलं
अडथळा बिलकुल मोकळा
सामोरं येतीलचं......
काही सुरळीत तर
काही खडतर
अन्
काही डोंगर पर्वत तर
काही दऱ्याखोऱ्यांच
मधूनच
कधी वादळ वारं
प्रशांत परिसर
आयुष्यात
न डगमगता जीवनाचा
प्रवास अखंडपणे
चालत राहायचं
एक ना दिवस
आपण सक्षम,समर्थ
प्रबुद्ध गौरवशाली जीवन
मान उंचावून जगणं
प्रेरणादायक ठरतं
© आत्मेश्वर