...

5 views

माझा प्रियकर
माझ्या प्रियकराला मी रोज भेटत नाही
पण भेटले की त्याला नजरेआड होऊ देत नाही

तो असतो नेहमी आपल्या बाह्या पसरून
मला कवेत घेण्यासाठी आसुसलेला
पण त्याच्या मिठीत मलाच सामावता येत नाही

कधी तो असतो खेळकर तर कधी उदास
कधी कधी बाबा आमच्या स्वारींना येतो रागच फार
रुसवे फुगवे हे तर नात्याचं सार

परतीची वेळ येते आणि डोळे पाणावतात
डोळ्यात कितीही भरलं त्याच रूप तरी पावलं अवघडतात
जड अंतःकरणाने निरोप द्यावाच लागतो

तो तसाच..
निस्तब्ध..
शांत..
अथांग..
समुद्र...


© hsk