...

4 views

प्रित तुझी माझी
तो तिला फेसबुकवर भेटला होता. अगदीच राजबिंडा होता अस नाही चार चौघांसारखाच होता साधा सरळ पण त्याची एक गोष्ट खुप चांगली होती ती म्हणजे तो खुप चांगली कविता करायचा त्या कवितांमुळेच तिला तो आवडला होता.
ही कथा आहे सानिका आणि सुयशची सानिका आणि सुयश दोघही वेगळ्या विचारांची कॉलेजमध्ये शिकणारी एकमेकांची ओळख नसलेली दोन वेगळ्या स्वभावाची मुलं होती. एक उत्तर होता तर दुसरी दक्षिण होती. सुयश एकदम शांत स्वभावाचा जिथे बोलण्याची गरज असेल तिथेच बोलणारा मुलगा होता तर सानिका खुप चंचल स्वभावाची होती तिला नेहमी स्वच्छंदी जगायला आवडत असे. दोघांचे स्वभाव भिन्न होते आणि विचार ही भिन्न होते. पण त्यांच्यात एक मात्र कॉमन गोष्ट होती ती म्हणजे सुयशला कविता करण्याची आवड होती आणि सानिकाला कविता वाचण्याची आवड होती. आणि दुसरी कॉमन गोष्ट म्हणजे फेसबुक.
सुयश आणि सानिकाला फेसबुकच खुपच वेड होत. एखाद्या समारंभात किंवा कुठे फिरायला गेल्यावर काढलेले सेल्फीज सानिका लगेच फेसबुकवर टाकत असे तसच कुठलीही छानशी चारोळी असो किंवा छानशी कविता असो काहीही सुचलं की सुयशला ही फेसबुकवर टाकायला आवडत असे. सानिका एखाद इंटरेस्टिंग प्रोफाइल दिसलं की लगेच फ्रेंड रिक्वेस्ट सेंड करत असे. तर सुयश मात्र खुप विचार पुर्वक रिक्वेस्ट एक्सेप्ट करत असे. अशी ही दोन विरुद्ध टोक होती.
एक दिवस दुपारी आपल्या मैत्रीणींबरोबर सानिका आपलं फेसबुक चेक करत बसलेली असताना तिला एक सुंदर प्रेम कविता दिसते. सानिका ती कविता वाचुन तिच्या प्रेमातच पडते तिचे शब्द इतके मधुर असतात की ती कविता सानिकाच्या मनात घर करून जाते. सुयशची कविता सुयशच्या एका मित्रानी शेअर केलेली असते. ती त्याला लगेच मेसेजमधुन रिप्लाय देते. त्यावेळी विराज(सुयशचा मित्र) ऑनलाईन असतो तो सानिकाचा मेसेज बघतो. आणि सानिकाला सांगत. "हाय माझं नाव विराज आहे मी नाही करत कविता.. तुम्ही जी कविता वाचलीत ती मी नाही तर माझ्या मित्राने लिहिली आहे. मला एखादी छान पोस्ट दिसली तर मी फेसबुकवर शेअर करत असतो. ही कविता मला माझ्या मित्राने सुयशने फेसबुक वर अपलोड करायला सांगितली होती म्हणून मी केली तुम्हाला हवं असेल तर मी त्याचा तुम्हाला नंबर देतो. फक्त मला त्याला एकदा विचारावं लागेल." ते ऐकुन तिला खुप छान वाटत. ती विराजला म्हणते. "सध्या नंबर नको मला फक्त एवढंच सांग तो फेसबुक वर आहे का?" विराज तिला सांगतो. "हो आहे न पण तो कुणाचीही रिक्वेस्ट पटकन एक्सेप्ट करत नाही त्याला सोशली राहायला जास्त आवडत नाही." सानिका थोडीशी नाराज होत म्हणते. " ठीक आहे मग तु त्याचा नंबरच दे मला. पण अनोळखी व्यक्तींचा नंबर तरी उचलतो न हा की कुणाशी बोलत पण नाही." मेसेजमधुनच विराज हसतो आणि सांगतो. "सुयश खुप साधा मुलगा आहे ग बस आपल्यातच रमणारा आहे तो खुप कमी फेसबुक वापरतो त्याला आपल्या कवितांमध्येच जास्त रमायला आवडत. पण तु बोल त्याच्याशी त्याला फक्त आम्हीच मित्र आहोत पण एकही मैत्रीण नाही आहे तुझ्या रुपात त्याला एक छान मैत्रीण मिळेल." विराज तिला नंबर देतो. सानिकाला खुप आनंद होतो. ती विराजला थँक्स म्हणते आणि सुयशला सांगायला सांगते. "मला कविता वाचायला कवितांना दाद द्यायला खुप आवडत रे आणि त्याची ही कविता इतकी छान आहे न त्या एका कारणा मुळे मला त्याच्याशी मैत्री करायला आवडेल. थँक्स ह तु मला त्याचा नंबर शेअर केलास पण प्लिज त्याला सांगुन ठेव मी त्याला मेसेज किंवा कॉल करेल. चल बाय." विराज म्हणतो. "हो तु काळजी करू नकोस मी बोलतो त्याला बाय." पुढे सानिका सुयशच्या विचारात मग्न होऊन जाते. पण काही क्षणातच भानावर येते आणि विराजची फ्रेंड लिस्ट चेक करते त्यात तिला सुयशच प्रोफाइल दिसत सानिका प्रोफाइल चेक करते तेव्हा त्यात तिला सुयशच्या बऱ्याच कविता दिसतात त्यावरून तिला समजत हा तोच सुयश आहे. सानिका त्याला रिक्वेस्ट सेंड करते आणि मेसेज करते. "हाय सुयश माझं नाव सानिका आय नो आपण एकमेकांना कधी भेटलो नाही. तसेच आपण ओळखत सुद्धा नाही. पण तरी मला तुझ्याशी बोलावसं वाटलं ते तुझ्या कवितांमुळे. तुझ्या कविता खुपच छान आहेत. त्यातुनही 'तुझाच मी' ही कविता खुपच सुंदर म्हणजे अगदी कुणीही प्रेमातच पडावं अशी आहे. त्या कवितेतले शब्द, भाव मनाला खुपच भावतात. म्हणून मला तुझ्याशी बोलावसं वाटलं मला माहित नाही माझा मेसेज वाचून तु कसा रिऍक्ट होशील पण प्लिज जेव्हा माझा मेसेज वाचशील तेव्हा जर तुला आवडलं तर मला मेसेज किंवा कॉल कर हा माझा नंबर आहे. मला तुझ्याशी बोलायला नक्की आवडेल बाय." सानिका सुयशला मेसेज करते आणि विराजला ही कळवते. "हाय आज तुझ्यामुळे मला सुयशच प्रोफाइल तुझ्या फ्रेंडलिस्ट मध्ये सापडलं मी त्याला मेसेज केलाय आणि माझा नंबर पण दिलाय न बघुत काय रिप्लाय येतो ते अगेन थँक्स फॉर द हेल्प आपण तर फेसबुक ला ऍड झालोच आहोत बोलत राहुत बाय." विराज "ठीक आहे" म्हणतो.
आता... सानिका आपलं रोज फेसबुक चेक करत असते ते सुयशच्या रिप्लाय साठी. एक दिवस जातो.. दुसरा ही जातो.. तिसरा दिवस ही जातो.. अस रोज सानिका सुयशच्या रिप्लायची वाट पाहु लागते. आणि एक दिवस सुयशचा रिप्लाय येतो. सानिकाच्या आनंदाला पारावारच उरत नाही तिचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. ती आनंदात सुयशचा मेसेज वाचते. "हाय सानिका तुझा मेसेज येण्या आधीच मला विराजनी तुझ्याबद्दल सांगितलं होतं. अग मी काही खुप मोठा प्रतिभावान शीघ्रकवी नाहीये मी बस मनात आलेल्या शब्दांना कवितेत गुंफण्याचा प्रयत्न करतो. माझ्या पेक्षाही प्रतिभावान कवी या जगात खुप आहेत. पण थँक्स खुप छान वाटलं तुझी दाद वाचुन. आपल्याला अस कुणी भरभरून दाद दिली की खुप मोठं असल्या सारख वाटत. तुझ्या दाद साठी मनापासुन आभार." सानिकाला सुयशचा मेसेज खुप आवडतो आणि मग असेच दोघ नेहमी एकमेकांशी कधी मेसेजमधुन तर कधी फोन वरून बोलु लागतात.
अशी सुरू होते सुयश आणि सानिकाची फेसबुकवरची लव स्टोरी.