...

42 views

"एक जन्म तुझ्यासाठी"...भाग-1
मी कधी विचार ही केला नव्हता, की माझ्या आयुष्यात तो मला भेटेल आणि मी संपूर्ण आयुष्य त्याच्या सोबत एकत्र घालवण्याचे स्वप्न बघेल...
तो आणि मी एकाच गावातील, आमचा वर्ग एकच पहिली पासून बरोबरच शिकलो, म्हणजे अर्थातच शाळा ही एकच होती... आमची मैत्री नकळत्या वयापासून सुरू झाली. तो खूप हुशार, धाडसी, समजदार पण तितकाच कडक स्वभावाचा... आणि मी खोडकर, बडबडी, मनकवडी, जिथे जाईल तिथे सगळ्यांना आपलंसं करून घेणारी... पण आमचे स्वभाव एकमेकांच्या विरुद्ध असूनही, तरीपण त्याची आणि माझी चांगलीच मैत्री जमली. एक एक वर्ग मागे टाकत म्हणजे शिकत आम्ही कळत्या वयात पाऊलं टाकली... मोठे कधी झालो हे वेळेबरोबर आणि वयाबरोबर कळलेच नाही...

मला तो खूप आवडतं होता... आणि तितकीच त्याला ही मी आवडायचे आणि आजही दोघे एकमेकांना... बालपणी जितकी मैत्री होती, त्यापेक्षा जास्त भांडणचं केले आम्ही ( मीच जास्त केले 😜) पण जसे वयाने कळायला लागले आणि प्रेम ही भावना मनात जाणवायला लागली तशी मी मनाने घाबरायला लागले. कारण कुठे तरी मन स्वतःशीच बोलत होते की तो आणि तू एक नाहीत होणार; पण का बरं असं होतं असेल? की माणूस सगळ्या गोष्टी बेधडक करतो, वागतो, बोलतो, राहतो. अगदी "एखाद्या निष्पाप जीवाचा जीव घेण्यापर्यंत पाप ही करतो..." त्यावेळी त्याला ना जनाची भीती, ना मनाची साक्ष असते. पण प्रेमासारख्या निर्मळ आणि पवित्र नात्याला घाबरून चोरून लपून ठेवावे लागते. आणि समाज ( समाज म्हणजे आपणच ) या नात्याला अपवित्र नाव देतो कधी चर्चेमधून, गप्पांमधून किंवा कधी timepass म्हणून... पण ते दोन मनं आयुष्यभर एकत्र राहण्याची स्वप्न बघत असतात, त्यांचा विचार, त्यांची धडपड, त्यांचे प्रेम आणि त्यांच्या भावना याला ना घरचे ना समाजातले लोकं साथ देतात...
( काल्पनिक कथा आहे )
क्रमशः...

{POURNIMA}🖊️