...

4 views

e Love
e love
पूर्वीच्या हळव्या प्रेमाच्या भावना हातात हात गुंफणे , गालावरचं स्मित,लाजून पायाने माती उकरणे आता कधीच मातीआड झालंय. आता चॅटिंग ,डेटिंग ,”मिटिंग” आणि finally break up ,who cares!!! प्रेमाच्या आणाभाका out dated झाल्यात. मॅरेज मटेरियल प्रेमवीरांना वाईट दिवस आलेत. होकाराची वाट पाहणे, झुरणे, विरह नावाच्या waiting साठी वेळ नसतो. कुणाशीही मनसोक्त गप्पा मारणे म्हणजे ‘’ तसलं काहीतरी असलं पाहिजे ‘’ ,(इथे हसणे, खिदळणे याला न मागता ‘प्रसिद्धी ‘प्राप्त होते.) या शंका कुशंकांमध्ये हिंदकळणऱ्या e love ने मैत्रीला टॅग केलंय. एखादया नखरेल नटविनं साध्य सुध्या गृहिणीला सौंदर्य स्पर्धेत हरवावं तसं....