...

2 views

रक्षाकवच(भाग-एक)
आज रोहीत खूपच खुश होता. कारण आज त्याच्या नव्या प्रोजेक्टच्या शूट चा पहिला दिवस होता. त्याला एक मोठ्या बॅनरच प्रोजेक्ट मिळाल होत त्यामुळे आज तो प्रत्येक काम अगदी उत्साहाने करत होता. जस काही त्याची सगळी स्वप्नच पूर्ण झाली होती.
रोहीत खूप फेमस होता अस नाही पण त्याच्या ही नकळत त्याचे खूप सारे चाहते बनलेले होते. रोहीत एक स्ट्रगलिंग ऍक्टर होता त्यांनी आपल्या आयुष्यात खूप खस्ता खाल्या होत्या खूप काही बघितल होत अनुभवल होत. पण तरी कधी खचला न्हवता. वाईट मार्ग तर त्याला स्वप्नात देखील माहीत नव्हते. म्हणूनच की काय आज त्याला खूप मोठी संधी चालून आली होती. तो आपल्याच विचाराने पुढे जाणारा मुलगा होता.
त्याला लोक नेहमी बोलायचे. "रोहीत अरे तु या इंडस्ट्रीत काम करतोस थोड तरी स्वतः मध्ये बदल कर. इथे काही दिल्या शिवाय कुठलच काम होत नाही कसा निभाव लागेल रे बाबा तुझा."
आणि तो मात्र हसून फक्त एवढच बोलायचा. "ती माणस खूप वेगळी असतात जी देतात ही आणि घेतात ही पण मी त्यातला नाहीये. माझ्या नशीबात एखादी चांगली संधी असेल तर ती माझ्या जवळ चालून येईल त्या साठी मी कधीच कुठलीही तडजोड करणार नाही. मी त्यातला नाहीये मी कधीच कुणाला काही देणार नाही आणि कुणा कडून काही घेणार नाही. आपल्या मेहनतीने आणि ऑडिशन्स देऊनच काम करेल मग भलेही वेळ लागला तरी चालेल."
या बोलण्यावर लोक नेहमी त्याच्या मागे त्याच्यावर हसायचे त्याची खिल्ली उडवायचे पण तो मात्र आपल्या विचारांवरच आपल्या मूल्यांवरच ठाम होता. त्याला कधी जगाची पर्वा नव्हतीच. तो नेहमी म्हणायचा. "मी हा असा आहे आणि कायम असाच राहणार तुम्हाला...