...

4 views

Story- Hii...मी झाड...
Hiii... मी झाड🌲
तशी माझी बरिच नावे आहेत पण मला माझ झाड हेच नाव जास्त आवडतं. माझी आई म्हणजे धरती माई. मी लहानाचा मोठा तीच्याच कुशीत झालो. तसे आम्ही पाचभावंडे सुर्य, चंद्र, पाऊस, वारा अन् मी..
सुर्य दादा आमचा सगळ्यात मोठा भाऊ आणि चंद्र दादा त्या नंतरचा. माझ्या माईने आश्रा दिलेल्या जिवांना योग्य तो रस्ता दाखवायचं काम सुर्य दादा अन् चंद्र दादा करतात. ते कामा मध्ये येवढे मग्न असतात की आमची भेट ही दुरुनच होते.
काही काळा पुर्वी आमच्या आईने मनुष्य नावाच्या प्राण्याला तीच्या कुशीत आश्रय दिला आणि त्यांची जबाबदारी माझ्यावर दिली. आई ने मला सांगीतल की आज पासून तुच यांची आई आणि तुच यांचा बाप. आज पासून ही तुझी मुलं. त्यांना जे काही हवं ते सगळ काही तु पुरवायच. मी त्यांना लहानच मोठं केल. पण जस-जसे ते मोठे होत गेले त्यांच्या मध्ये बदल दिसून यायला लागले. आमच्या आईने त्यांना सहारा दिला आणि आज तेच आमच्या आईला मरणाच्या वाटेवर लोटू लागलेत. मी राग सहन करू शकतो पण माझे बाकीचे भाऊ राग थोडा सुध्दा सहन करू शकत नाही. त्यात आमच्या सुर्य दादाचं तर सांगायलाच नको. जर मनुष्य प्राण्यांने आईला काही त्रास दिला तर सुर्य दादा खुपचं चिडतो. जेव्हा-केव्हा सुर्य दादा चिडतो तेव्हा सगळे मनुष्य प्राणी माझ्या आडोशाला येऊन लपतात. कधी - कधी मला पण त्यांचा खुप राग येतो पण मी काही करू शकत नाही कारण ती माझीच मुले आहेत. आमचा वारा दादा खुप मायाळू आहे. जर कधी सुर्य दादा चिडला की वारा दादा मनुष्य प्राण्यांच्या मदतीला जातो. पण जर कधी वारा दादा चिडला की मनुष्य प्राण्यांची काही खैर नाही. आमचा पाऊस दादा हा दुसरीकडे कामाला असतो. तो वर्षातुन ३-४ महिनेच आम्हाला भेटायला येतो. मनुष्य प्राण्यांना माझ्या पाऊस दादाची खुप आस असते. ते पाऊस दादा येण्याची खुप वाट पहात असतात. तो आला की सगळेच खुप खुश होतात.
पण जर कधी दादाला समजलं की त्यांनी आईला खूप त्रास दिलाय. मंग त्यांची कही खबर नाही. मंग तो त्यांना असा कही झोडपतो की सांगायला नको.
मनुष्य प्राण्यांना आई आणि आम्ही भावांडे सगळं काही देतो. पण त्यांची हाव आता येवढी वाढलीये कि ते आमच्या आईला नष्ट केल्या शिवाय राहणार नाही. मी पण त्यांना स्वताच्या मुलांन प्रमाने जपलं पण त्यांच काम झाल्यावर त्यांनी मला पण नाय सोडलं ते माझ्यावरच धावून आले. मला माझ्या मुलांना येवढच सांगायचं की जशी धरती आमची आई आहे तशी ती तुमची पण आई आहे. ती आहे तर आपण आहोत म्हणून तीची काळजी घ्या येवढीच विनंती. तुम्ही जर तीला असेच त्रास देत गेलात तर माझे भाऊ तुम्हाला नाही सोडणार आणि तुम्हाला काही झालं तर मी नाही जगू शकणार.
Please तीची काळजी घ्या.....🙏
- अजित पवार(Aj)
© All Rights Reserved