...

7 views

माहिती ,ज्ञान आणि शहाणपण
  
   माहिती ,ज्ञान आणि शहाणपण ह्या दैनंदिन जीवनातील उपयुक्त आधुनिक संकल्पना स्पष्टतेसाठी,  प्राचीन कथेचे मी केलेले आविष्करण  हि सर्वथैव माझी वैयक्तिक अनुभूती , मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान यांना आधारभूत ठेवून केलेली आहे. ज्ञानी ,शहाण्या गुणिजनांनी आपल्याठायी असणाऱ्या ज्ञान आणि शहाणपणाची जोड देऊन,  ही अपूर्ण कलाकृती मनीमानसी पूर्ण करावी , हा विनम्र अनुरोध.
       निरागस बालमनावर गुरुकुलातील देवरूपी गुरूंचे संस्करण होत असे ,असा हा काळ . निः संग ऋषींचा ज्ञानरुपी सहवास लाभून , ज्ञानार्जनाचा समारोप करून शिष्य स्वगृही परतणार होते . ज्ञानी , अनेक प्रकारचे विषय आत्मसात केलेले , अनेक विद्यार्थी दीक्षादान समारोहात श्रेष्ठ शिष्याची उपाधी मिळविण्यासाठी तत्पर झाले. अग्रक्रमी असणाऱ्या तीन शिष्यां मध्ये स्पर्धा चुरशीची होणार हे नक्की होते. 
     पहिला शिष्य कुशाग्र बुद्धीचा . त्याची मेंदूची संग्रहण शक्ती तीव्र. दुसरा ज्ञानी,उत्तम सल्लागार. तिसरा अनुभवाने , कृतीने प्रश्नांची समस्येची उकल करण्यात निष्णात . या निर्णायक सभेत काही निष्कर्ष निघणार तोच ,आजूबाजूच्या वस्त्यांमधील काही नागरिक ऋषी आश्रमात येतात. अवर्षणग्रस्त           ( पाऊस न पडल्याने ओढवणारा सुका दुष्काळ) त्या दीन गावकऱ्यांची मदत करण्यासाठी ऋषी त्या तीन शिष्याना आज्ञा देतात. राजाची मदत मिळण्यापूर्वी प्राथमिक सहाय्यता देण्याच्या त्यांच्या क्षमतेवरून श्रेष्ठत्व सिद्ध होणार असते. तिघेही काही दिवसांसाठी तीन गावांत रवाना होतात.
      मध्यंतरी , लोकांकडून मुनी त्यांच्या...