...

50 views

सुख म्हणजे काय असतं...!
सुख म्हणजे काय असतं...!!!
सुख या शब्दाची प्रत्येकाची व्याख्या, स्पष्टीकरण आणि अनुभव वेगवेगळे असतात...
सु - सुरुवात*** !!!
ख - खऱ्याची*** !!!
सुख या शब्दाचा खरा अर्थ शोधायचा असेल तर आधी स्वतःपासून "सुरुवात खऱ्याची" खऱ्यापासून खऱ्यापर्यंत करायची मग आयुष्यात जगण्यात सुख आपोआपच भेटतं... विनामूल्य, मुफ्त, फुकट... त्यासाठी सत्याच्या मार्गाने जावे लागते सुख शोधायला !

सुख वेगळं आणि आनंद वेगळा दोन्हीची व्याख्या वेगळी, पण उत्तर एकच आहे "समाधान"....
"दुसऱ्याच्या मनाला दिलेला आनंद, त्याच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसून मिळालेलं समाधान... म्हणजे सुख असतं..."
सुख हे आपल्या विचारातील मानण्यावर आहे आणि आनंद हा दुसऱ्यांचा विचार न करण्यावर आहे.
म्हणजे ! आपण जर आपल्याला सुख हवे असेल तर, आपल्या मनाला माहित असते की, आपण खरे, किंवा सत्य आहोत की नाही, तर आहोतच प्रामाणिक याची खात्री स्वतःच्या मनाला माहित असते. मग ते झाले "सुख"...! आणि आता आनंद जर आपल्याला आनंद हवा आहे, तर जे आपल्या आयुष्यात घडत आहे म्हणजे वर्तमानात... त्याला स्वीकारून, नुसते स्वीकारून नाही तर त्याला वास्तवाची जाणीव करून देऊन अंतरमनाने स्वीकारून ( accept ) जगाचा विचार न करता ( विचार करायचा पण limited, आणि दुसऱ्यावर अन्याय करायचा नाही, कदापिही कोणा जीवावर अन्याय करायचा नाही !नाहीच आणि स्वतः वरही होऊ द्यायचा नाही ) विचार म्हणजे "कर नाही त्याला भीती नसते"...

जग ( समाज ) म्हणजे कोण...? ज्यावेळी आपण स्वतः स्वतःची बाजू मांडण्यासाठी उभे असू तेव्हा आपण स्वतः जग या शब्दात बसत नाहीत, मग स्वतः सोडून सगळे त्यावेळी आपल्यासाठी जग असतात.
पण जेव्हा समोरचा ही त्याच जागी त्याची बाजू मांडताना उभा असतो तेव्हा त्याच्या साठी ही आपण जगच असतो. हीच जगाची रीत आहे ! आणि हेच वास्तव आहे जगाचे जगातल्या जगण्यातले...

म्हणून "ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे" सुख हे प्रत्येकाजवळ आहे.
सुख शोधले तर बारीक, लहान, छोट्या, अल्प गोष्टीत ही आहे. त्यासाठी बलाढ्य श्रीमंती असायला हवी असे अजिबातच नाही...
सुख हे मनातील "आवडत्या सकारात्मक" विचारात आहे !
सुख हे विचारातील कल्पनेत आहे !
सुख हे खळखळून हसण्यात आहे ! सुख हे कधीतरी मन मोकळं व्हावं म्हणून ढसाढसा रडण्यात आहे !
सुख हे आवडत्या जेवणात आहे !
सुख हे आपल्या आवडत्या व्यक्तीशी केलेल्या संवादात आहे !
सुख हे स्पर्शात आहे, प्रेमात आहे, आकाशात आहे, जमिनीत आहे, फुलात आहे, वासात आहे, रंगात आहे, नजरेतील रुपात आहे, आवडणाऱ्या गाण्यात आहे, प्रवासात आहे, भेटीत आहे.
सुख हे स्वप्नात आहे आणि त्याहून ही मानले तर सत्यातच खरे सुख आहे...
सुख हे मुळात शब्दात सांगता न येणारा शब्द आहे. "पण सुख हे स्वत:जवळच आहे. मी माझ्या मनातील सुखाची भाषा रेखाटली आहे माझ्या शब्दात, तसेच सुखाची शब्द रचना ही प्रत्येकाची निराळी आहे...
पण सुख हे खूप सुंदर आहे आणि अनमोल आहे, मुफ्त आहे, सुख हे उपभोगायला यायला हवे अनुभवातून प्रत्येकाला..."

{Poonam}🖊️