...

1 views

प्रिय बाबा
प्रिय बाबा,

त्रिवार अभिवादन. सर्व प्रथम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. मी..! सोनाली. तुम्ही घडवू पाहणाऱ्या लोकशाही प्रधान देश्यातील एक सामान्य मुलगी. बाबा तुम्ही आमची ओळख आहात आमची प्रेरणा आहात. जगायला शिकले ते तुमच्या संघर्षामुळेच. तुमच्या विचाराने, तुमच्या प्रयत्नाने तळागळातील माणसाना माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळाला. माझ्या सारख्या किती तरी मुली आज बोलत्या झाल्या लिहित्य झाल्या. अर्थात त्याचच फलित म्हणून मी आज तुम्हाला हे पत्र लिहीत आहे. कारण तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्राम वर नाहीत ना..! तिथे तुम्ही असता तर मेसेज केला असता बघा. पण बर झाल नाही ते. मलाही इनबॉक्स उघडावास वाटत नाही. बाबा तुम्ही आम्हाला जगाला प्रेम आणि मैत्री शिकवणाऱ्या जगत वंदनीय बुद्धाची ओळख करून दिली पण तो बुद्ध इथल्या मुलांना आणि पर्यायाने इथल्या समाजाला सुद्धा समजला नाही किंवा त्यांना तो समजून घेण्यासाठी वेळ मिळाला नाही अस आपन म्हणू..! हल्ली इनबॉक्स मध्ये हेतु पूर्वक टाइम पास करण्याचे आणि शिरीरसुखाची अपेक्षा ठेवणाऱ्याचे अशलीन मेसेज जास्त असतात. म्हणून आता किळस येते आहे त्या समाज माध्यमांची. असो
बाबा ऑफिस मधून घरी जाण्यासाठी ऑटो ने रोजचा प्रवास असतो. पण ऑटो मध्ये भीमगीत वाजवणारे आणि वाघांच काळीज असणारे भीमपुत्र आणि शिवपुत्र समोरच्या आरशयातून नजरेनेच काळजाचे लचके तोंडतात. अर्थात अस भोगणाऱ्या मुलीनं मध्ये मी पहिली नाही आणि शेवटची ही नसेल. बाबा सगळ्याना अशा गोष्ट खूप सहज वाटततात. त्यामुळे आयुष्यच नकोस वाटू लागल आहे. पण मी घरी येई पर्यन्त मोकळा श्वास न घेणाऱ्या, वाट पाहत दरवाज्यात उभ्या असणाऱ्या माझ्या आईला माझी ही घुसमट मी सांगू शकत नाही. म्हणून आज भीमाई ला सांगते आहे. बाबा वासनेने भरलेल्या या लोकाना प्रेम आणि मैत्री चा अर्थ का कळत नसेल ? अशा परिस्थितीत बाबा तुमच्या मिठीत यावस वाटत आहे. मला आणि माझ्यासारख्या अनेक मुलीना जगाच्या पाठीवर तुमचीच मिठी जास्त सुरक्षित वाटते. बाबा स्त्री उन्नतीसाठी, स्त्री शिक्षणासाठी तुम्ही, सावित्रीमईनी, ज्योतिरावांनी आणि अनेक महापुरुषांनी अपार कष्ट सोसले, हालअपेष्टा सहन केल्या. माझ्या सावूने तर दगड माती सुद्धा अंगावर झेलली. स्त्रिया शिकल्या, मोठ्या झाल्या नोकरीं करायला लागल्या पण आज च्या स्त्रीला अजून ही स्वतःचे निर्णय स्वतः घेता येत नाहीत. मग निर्णयावर ठाम कस राहणार..? आता ते कस हा एक मुक्त चिंतानाचा विषय आहे. असो पण काहीही झाल तरी आम्ही हार मानणार नाही एवढी खात्री असू दया.
बाबा मागच्या 4/5 वर्षात तुम्ही सुद्धा महाराजांसारखे टी व्ही वर आलात. टाय कोट सुटबुतात वावरणारे, हातात संविधानाच पुस्तक असनारे बाबासाहेब पाहण्यातच आम्ही धन्यता मानली. आणि बाबासाहेबांची भूमिका करणारा अमुक अभिनेता कसला भारी दिसतोय ना..! हे बोलताना तहान भूक हरवून पुस्तकाच्या दुनियेत रमनाऱ्या त्या शोधवेड्याला नाही समजून घेता आल आम्हाला. instagarm रील्स, वोट्स अप्प चे स्टेट्स, फेसबुक यानंतर नाही जावस वाटल त्या जाडजूड पुस्तकांकडे. 14 एप्रिल हा दिवस सण म्हणून साजरा करणाऱ्या तुमच्या अनुयानंना तुमच्या कार्याचा आणि विचारांचा विसर पडला ही मान्य करांव लागेल. बाबा इथे कोणता महापुरुष कोणाचा आहे हे आता इथल्या लहान लहान पोरांना ही कळायला लागल आहे पण तुम्ही त्यांना गुरु का मानल असणार हे समजून घेण आम्ही कधीच गरजेच नाही समजल. विचारांचा वारसा जपायचा विसरलो आम्ही.
बाबा तुम्ही सर्वाना एकदाच मतदानाचा हक्क बहाल केलात आणि युगोयुगाचा भेदभाव कायमच नष्ट झाला. कधीकाळी ज्यांच्या सावलीचा ही विटाळ व्हायचा आता आमदार, खासदार आणि निवडणुकीत उभा असणार तो प्रत्येक माणूस आमच्या दरात येतो मत मागायला किंवा विकत घायला. त्या बदल्यात आम्ही त्याच्या कडे मागतो रस्त्याला आपापल्या महापुरुषांची नाव, स्मशानभूमीचा कंपाऊंड वॉल, आंबेडकर नगर ची कमान अस बऱ्याच काही..! पण कॉन्व्हेंट च्या शाळेत जस उच्च प्रतीच शिक्षण मिळत ना तसच शिक्षण आमच्या ही पोरपोरींना मिळूडे अस म्हणणारा एक ही जन त्यात मला तरी अजून काही दिसला नाही. बाबा स्वबळावर धनुर्विविद्या मिळवणाऱ्या एकलव्या कडून गुरुदक्षिणेच्या नावाखाली त्याची विद्या कायमची हिसकावून घेतली गेली. हल्ली कुणी गुरु दक्षिणा मागत नाही. आता आकारली जातो महाविद्यालयीन शुल्क. महागाईच्या काळात भरगच्च फीसच्या नावाने थोड फार शिकलेल्या आजच्या पोरांकडून सुद्धा उच्च शिक्षण असच हिसकावल जात आहे आणि याची सूतराम कल्पना आम्हाला नाही. सर्वसामान्य माणसाने इतकी फीस कशी द्यावी आणि नाही तर त्याच्या पोरांना शिक्षण कस मिळेल ? शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी मिळत नाही आणि यावर कुणीच काही बोलत नाही बाबा.
बाबा तुमची जयंती साजरी करायची की नाही ही मला काळात नाही पण इतक नक्की कळत आहे की आता सगळ्याच महापुरुषांच्या जयंतीच स्वरूप बदलायला हव. डिजे च्या लाखोंच्या खर्चातुन आपण किती ग्रंथालयाची उभारणी करू शकू याचा हिशोब लावायला हवा. आजच्या पोरपोरीना वाचनाकडे कस नेता येईल याचा विचार व्हायला हवा. जिममध्ये जाऊन शरीर बळकट केल्यापेक्षा चांगल आणि वाईट काय हे ओळखू शकेल अस मस्तक तयार करण आणि योग्य निर्णय घेण महत्वच आहे हे समजायला हव. बुद्धानी सांगितलेला बुद्धीप्रमाण्यवाद, कार्यकारण भाव, प्रतीतसमीपतीवाद आचारत कसा येईल यासाठी प्रयत्न व्हायला हवे. बुद्ध विहारे ही संस्कार केंद्रे व्हावीत. तुमची खूप काम आहेत जी तुम्ही आमच्या वर टाकून गेलात आणि ते पूर्ण करण आमच कर्तव्य आहे. काहीना याचा विसर पडला आहे इतकंच. असो
आणि हो जमलच तर अजून एक करा जसे सगळे म्हणतात तस काही पुनः जन्मला येऊ नका.. कारण पुनः तेच सगळ तुमच्या वाटेला येईल. आणि माझा हाच निरोप महाराजांना पण सांगा.. बायको पोरसणी मातीत घालून.. किती लढाल? किती झिजाल आमच्या साठी ? बास झाल आता..
तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्या, डोक्याला निळा फेटा, कपाळाला नीळ लावलेले तोंडात मावा आणि दारूच्या नशेत डिजे च्या तालावर नाचणाऱ्या या अनुयायांची ही अवस्था तुमच्या कडून पहावली जाणार नाही. या डिजे च्या आवाजाने महाराजांना जसा त्रास झाला तसाच त्रास तुम्हालाही होईल. सवय नाही तुम्हाला म्हणून जरा काळजी घ्या.
बाबा खूप काही आहे बोलण्या सारख. पण बाकीच पुढच्या पत्रात बोलू. पुन्हा एकदा जयंती च्या खूप खूप शुभेच्छा...
काही चुकल असेल तर मोठ्या मनाने माफ करा... तूर्तास थांबते..!

आपली विश्वासू,
सोनाली.


(सोनाली आहीरे)
#Kasturi_Mann