...

1 views

माझे साडीचे कपाट
*माझे साडीचे कपाट*

*जेव्हा जेव्हा मी उघडते माझ्या साडीचे कपाट*
*कित्येक आठवणींच्या साठवणी मांडतात थाट*

*नीटनेटक्या एकावर एक साड्या सुरेख मांडलेल्या*
*शिस्तीत जणू स्मृतींच्या घड्या सुंदर या रचलेल्या*


साडी म्हणजे प्रत्येक बाईचा अगदी जवळचा विषय असतो. कपाट साड्यांनी गच्च भरलेला असला तरी नवीन प्रकारात साडी आली की ती हवीहवीशीच असते, असं हे बायकांच साडी प्रेम अगदी तसेच माझे पण काहीसं हे साडीचे प्रेम म्हणा की वेड? साडी म्हटलं की प्रत्येक महिलेच्या मनात एक वेगळी जागा असते. लग्नात वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या असोत अथवा कोणत्याही कार्यक्रमासाठी साडी निवड असो. प्रत्येक महिलेला आपल्या कपाटात साड्या हव्याच असतात.

आज पंजाबी ड्रेस, कुर्ती, वेस्टर्न, वनपीस जरी घालत असलो तरी साडी म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. कुठली नवीन साडी आली की ती...