...

47 views

प्रयत्न...
प्रयत्न हा शब्द मनात, बोलण्यात आणि वागण्यात आला, की आपल्याला जी कृती, कार्य किंवा काम करायचे आहे त्याला प्रयत्न या एका शब्दांनी यश हे निश्चितच असते. आणि यशाकडे व भविष्याकडे आपली दिशा, जोर, उत्साह, आधार आणि पाठिंबा घेऊन वाटचाल करण्यासाठीची जी धडपड हमखास ठरलेली असते... म्हणजे प्रयत्नांती परमेश्वर किंवा कष्टाचे फळ आपण म्हणतो ना ते ठरलेले असते... मला तर वाटते की प्रयत्न या शब्दाचेच दुसरे नाव मेहनत आहे... कारण प्रयत्न हा शब्दच अपयशाचा नाश करण्यासाठी कष्ट आणि कृतीतून निर्माण झाला आहे...

प्रयत्न म्हणजे काय ! तर यशाचे खरे रहस्य, गुपित आणि उत्तर आहे प्रयत्न... "जिथे कमी तिथे आम्ही..." कोणी मैत्री जुळवण्याचे प्रयत्न करतात... कोणी नाती टिकवण्याचे प्रयत्न करतात... कोणी मेहनतीचे प्रयत्न करतात... तर कोणी एकमेकांना सहकार्य करून भविष्य घडवण्यासाठीचे प्रयत्न करतात... प्रयत्न हा प्रत्येक गोष्टीत माणसांना जगण्यासाठी बळ देतो. आयुष्याचे गणित सोडवण्यासाठी प्रयत्न नावाचे सूत्र वापरले तर जीवन नावाच्या परीक्षेत 100% गुण हे ठरलेलेच आहेत...
फक्त आळस आणि गर्व झटकून टाकून, प्रयत्नांना सोबत घेऊन, आलेल्या क्षणांना तोंड देऊन, आत्मविश्वासाने प्रगतीचा मार्ग शोधता यायला पाहिजे...
मग "यश हे निश्चितच आपलेच आहे..."
अपयश ही यशाची पहिली पायरी आहे... पण या प्रत्येक पायरीवर प्रयत्न नावाची विट उभारली आहे...

{Poonam}🖊️