थोडंसं आयुष्य...
माणसाच्या आयुष्याची चालती बोलती जिवंत गाडी... आयुष्याची गाडी...!
आपली सुख दुःखाची, नकळत भेटलेली, सुंदर आणि अविस्मरणीय आयुष्याची गाडी...!
आज का? मी दुखावले... खरचं का बरं आपण कोणाला इतका जीव लावतो आणि ती माणसं अचानक आपल्या आयुष्यातून निघून जातात...
( मग ओळखीच का ? होतात...! एकमेकांच्या, का मनं जुळतात... आणि का ? पुन्हा जोडलेली नाती, जुळलेली मनं, शब्दांच्या संवादातून दुरावतात...! )
आपण सगळेजण जीवन नावाच्या गाडीत प्रवास करत आहोत... आणि आपली गाडी एकच आहे, परंतु चाढण्या उतरण्याची वेळ प्रत्येकाची वेगळी आहे. पण शेवटी सगळ्यांना एकाच गावाला जायचं आहे ( मरण ) पण आज कोणाला कोणत्या गाडीत जागा भेटेल तो तिथे चढत आहे...
आपापल्या स्वभावांनी, आपल्या गुणांनी आणि आपल्या विचारांनी त्याला तिकीट भेटत आहे.
आणि प्रत्येकजण आपापल्या जाग्यावर बसून पुढे जात आहे...
आता या गाडीत कोणाला कोण भेटेल ते सांगता येणार नाही. पण कोणाला कोणी ना कोणी नक्कीच भेटेल...
कोणाचे विचार जुळतील, तर कोणाची मनं जुळतील... कोणाच्या भावना कोण समजून जाईल, तर कोणाच्या भावना कोणाला समजून ही त्या व्यक्त होणार नाहीत... मग शब्दाशब्दातून सुरू होतो आयुष्याचा प्रवास... आणि मग जीवनाच्या वळणावर गाडी कधी कुठे चढाला तर कधी उताराला थांबेल...
मग वेळ येते ती उतरायची गाडीतून...
छोट्याश्या आयुष्याच्या गाडीतून, आपल्या सोबतचा कुणाचा प्रवास कुठे थांबेल आणि कोण कुठे उतरेल कोणालाच कुठे आहे माहीत... कधी आपण तर कधी कोणी, अचानक साथ सोडून निघून जाईल...😔
आणि असचं आयुष्य कधी मनासारखं तर कधी मनाविरुद्ध जगावं लागतं...!
जीवनात भेटलेल्याला आठवतं...!
डोळ्यात दाटलेल्याला साठवतं...!
हृदयात गुंफलेल्याला विणतं...!
शब्दात वाचलेल्याला मांडतं...!
कल्पनेत रचलेल्याला जुळवतं...!
आणि आयुष्याचं नातं जपतं...!
आयुष्यात असचं आठवतं, साठवतं, विणतं, मांडतं, जुळवतं आणि जपतं जगायचं आहे...
आणि कधी आपण तर कधी कोणी ठरलेल्या ठिकाणी उतरून आपापल्या रस्त्याने चालत पुढं जायचं आणि एक दिवस अशाच जीवन नावाच्या गाडीतून सगळ्यांना कायमचा प्रवास संपवून आयुष्याचा शेवटचा निरोप घ्यायचा आहे...
मग त्यावेळी या जीवन प्रवासात भेटलेली माणसं आपल्या सोबत नसतील... फक्त मागे असतील त्यांच्यासाठी उरलेल्या आपल्या आठवणीं आणि आपल्यासाठी त्यांच्या साठलेल्या फक्त आठवणीं...😭
16.3.2021
{POURNIMA}🖊️