...

2 views

नागमोडी रेषा
ह्या पांढऱ्या वाकड्या तिकड्या
तिरक्या नागमोडी रेषा

हे थुलथुलीत लिबलिबित
शिथिल ओटीपोट

हे सिझेरीयने कापून
शिवलेले सात अस्तर

जगातल्या कुठल्याही कंपनीने
बनवू नये ह्या खुणा घालवण्याचं औषध

जगातल्या कुठल्याही कंपनीने
बनवू नये ह्या रेषा लपवणारं क्रिम

आम्ही मिरवू ह्या खूणा पोटभर
पांढऱ्या वाकड्या तिकड्या
तिरक्या नागमोडी

विनासंकोच उघड्यावर
दुग्धपान करवू बाळाला बिनदिक्कत
नकोय आम्हाला हिरकणी कक्ष

आम्ही जन्माला घालू
स्त्री पुरुष किंवा तृतिय
तुमच्या परवानगीशिवाय

अथवा
शिवून टाकू गर्भाशय तसंच
काहीच न प्रसवता

मिरवत राहू कोरं करकरीत पोट
अथवा ह्या पांढऱ्या वाकड्या तिकड्या
तिरक्या नागमोडी रेषा.

सारिका उबाळेच्या #कथार्सिसमधून

#11एप्रिलराष्ट्रीयमातासुरक्षादिवस