वनमानुष
कर्मफलाच्या आसक्तीचा त्याग करून ,कर्मेंद्रिये संयमित करून , नि:स्पृह जीवन व्यतित करणे , स्वामित्व भावनेचा त्याग करणे, हे आत्मनुभूतीकडे नेणारे मानवाचरण धर्म ग्रंथात विषद आहे. स्व -भान म्हणजे स्वतः च्या क्षमता , मर्यादा यांचे योग्य ज्ञान असणे , बुद्धी स्थिर असणे ,तटस्थपणे परिस्थितीचे अवलोकन करणे आदी संकल्पना मानसशास्त्राने मांडल्या आहेत . आध्यात्म आणि मनोविज्ञान या दोन्ही प्रवाहांचे स्वतंत्र अस्तित्व आणि महत्त्व मी शिरोधार्य मानून माझ्या आंतरिक जाणिवेनुसार " आत्म प्रचिती" हे सामायिक ध्येय ठरवून ,ते विषद करीत आहे . हा सर्वथैव माझा वैयक्तिक आत्मविष्कार असून , माझी तात्कालिक भावावस्था आहे . मी नित्य अध्ययनशील असल्याने माझ्या स्वानुभूती कालानुरूप परिवर्तित होणे, हे देखिल मी अमान्य करीत नाही. कलाकृतीस ज्ञातृनिरपेक्ष अस्तित्व असते . रसिकांचा कलास्वाद हा खास त्यांचाच असतो. सुज्ञ वाचकांनी आपल्या अनुभूती आणि बुद्धीची जोड देऊन ही लेखनकृती आपल्या मनः पटलावर परिपूर्ण करून सुफल करावी, असा विनम्र अनुरोध . तसाही माझा स्तंभलेखनाचा हा डोलारा सुज्ञ वाचकांनी आपल्या सहनशक्तीचा एककल्ली खांब देऊन तोलून धरला आहे.
एक व्यापारी जोडपे एक खेड्याचे छोट्या town मध्ये रूपांतर करून विकास घडवून आणते. छोटे मॉल्स ,रुंद रस्ते ,पूल, आणि सुखसोयीची साधने सहज उपलब्ध होतील अशी यंत्रांची दुकाने ,घरांची रचना , देवळांत , मठांत डिजिटल उपकरणे यांमुळे गाव आधुनिक बनतो . जनता आणि जनार्दनाची सेवा केल्याने पुण्य प्राप्ती होईल व मनातील इच्छा फलद्रुप होतील , असा त्यांचा मानस असतो . 6/7 वर्षांचा त्यांचा एकुलता एक मुलगा 10 वर्षांपूर्वी हरवलेला असतो . अनेक गावांत , वस्त्यांत ,शहरांमध्ये शोध घेवूनही तो सापडलेला नसतो. गरजूंना सुख साधनांची उपलब्धता करून देऊन अपल्याला आपल्या सुखाचा ठेवा सापडेल , अशी त्यांना आशा असते. खेड्याच्या नूतनीकरण सोहळ्याला एक सिद्धहस्त स्वामी आणि प्रगल्भ वैज्ञानिक यांना पाचारण करण्यात येते . स्वामी निर्मळ मनाचे आणि शुद्ध चारित्र्याचे आहेत. ज्ञानाच्या शोधार्थ अनेक धर्म ग्रंथांचे पठण...