...

6 views

Love is in the air ❣️







" Hello "
" Hi"
" जेवण झालं?"
" हं "
" काय करतेयसं ?"
" काम आहे रे थोडं...नंतर बोलूया..."
" हो! तसही आता तुला माझी अडचणचं होते ना!" तीचं वाक्य पुर्णही न होऊ देता तो तीकडून हसत हसत म्हणाला.
" अं..नाही असं काहीचं नाही "ती जराशी गडबडतचं!
" हो ना !एवढी का गोंधळतेस! " तो अजूनही हसऱ्या टोनमध्येचं तीच्याशी बोलत होता.
पण त्याचं ते हसून बोलणं किती वेदनादायी आहे हे ती उमजून गेली.
" नाही गोंधळले "
" हं...एवढं काय काम असतं गं आजकालं? म्हणजे सारखं काम काम करत असतेस म्हणून विचारतोय "
" अं...ते नेहमीचचं! आॅफीस घरकाम वगैरे! " ती वरवरचं बोलत होती.
" हं चांगल आहे.चोवीस तास आॅन ड्युटी! " त्याचा तोचं पुन्हा हसरा आवाज!
" नाही म्हणजे ते.."तिचं काहितरी समजवून सांगण्याचा प्रयत्न.
" अगं हो! मला माहितं आहे तूला खूप काम असतं.आता मी ही बिझी झालोयचं की."
" हं "ती फक्त हुंकारली.
" पहीले रिकामटेकडा होतो तेव्हा बसायचो तुझ्याशी तासंतासं गप्पा मारत! तु ही खूप बडबडायचीस.आता नोकरीला लागलो, सतत कामाच्या गराड्यात असतो पण तरिही तुझा एक तास नेहमीसारखाचं राखीव ठेवलायं! पण तुझ्यावर मात्र कामाचा लोड भलताचं वाढलेला दिसतोय! " शेवटचं वाक्य बोलून तो मोठ मोठ्याने हसू लागला,अगदी डोळ्यांतून पाणी येईपर्यंत!
" असं का रे श्री! " तीचं मन हळहळलं.तीचं मन स्वःतापेक्षा त्याला जास्त ओळखायचं!
" अगं खरचं! किती काम काम करत असतेस.साधं एक मिनीट बोलायला ही वेळ नाही भेटत तुला हल्ली! " तो डोळ्यात साचलेल्या पाण्यासोबत हसतचं होता.
" श्री रडतोयसं? " तीने हळवं होतं विचारलं.
" नाही गं मी तर चांगला हसतोय की. रडेन कशाला? "
त्याचं हसणं काही आज थांबत नव्हतं.
"खोटं बोलू नकोस श्री...रडतोयसं तू! "ती
" हे कळतं मगं जे समजायला हवं ते नाही का गं कळतं "त्याचा आवाज क्षणात बदलला. अचानक हळवा झाला तो.
" श्री ऽऽऽ " तीच्या डोळ्यातही पाणी साचलं!
" बोल ना! नाही समजतं का तूला?का अशी वागतेस.दूर दूर राहतेस.सतत कामात असल्याचे ,बिझी असल्याचे बहाणे देतेस.खरचं एवढा नकोस झालोय का मी तूला आता..."
" श्री तू.. "तीचा कंठ दाटून आलेला.ती पुढे काहीचं बोलु शकली नाही.
" सांग ना एवढा नकोसा झालोय मी?पुर्वी मी बोललो नाही तर स्वतःहून मॅसेज करायचीसं, फोन करायचीसं पण आता मी एकटाचं बोलतं असतो तू मात्र गप्प राहतेस.दूर जाण्याचे बहाणे शोधत राहतेस.मला समजतं नाही का ते मुकु !"
ती काहीचं बोलतं नव्हती.
" का अशी वागतेस गं! का छळतेस माझ्या जीवाला.आधी एवढा जीव लावलासं.सख्या आईवडीलांनी जीथे पाठ फिरवली तीथे तू माझ्यावर विश्वास दाखवलासं.मला आत्मविश्वास देत ऊभं राहायला शिकवलसं आणि आता सारं सुखं माझ्या पायाशी लोळणं घेतयं तर तूचं..." त्याला पुढे बोलवलचं गेलं नाही .
" नाही रे तसं श्री! "
" मगं कसं आहे सांग ना समजावून.बोलून तर बघं ना एकदा..की विश्वास ठेवण्याएवढा ही लायक नाही राहीलो "
" श्री काहिही काय बोलतोयसं तू हे...वेडा आहेस का? " ती जरा आवाज चढवतचं म्हणाली.
"हो आहे,तुझ्यासाठी वेडा श्रीचं आहे मी! तुचं या वेड्याचं सारं काही आहेसं.अशी अबोला धरू नकोस गं जीव तिळतीळ तुटतो माझा.का अशी परीक्षा घेतेयसं माझी "दोघांच्याही डोळ्यांतून एव्हाना अश्रू ओघळू लागलेले.
"माफ कर मला " ती स्फुंदत स्फुंदतचं म्हणाली.
" मुकु माफी परक्यांची मागतात मी तर कायमचाच तुझा आहे.माझी माफी मागून मला लाजवतेस का? "
" असा कसा रे तू,मी तुझ्याशी एवढं तोडून वागले तरिही तू... "तीच्या ओठांवर रडता रडता हसू आलं.
" कसा ही असेना,तुझाचं आहे मुकु...मला अंतर देऊ नकोस.जीव जाईल... "
" श्री ऽऽऽ " त्याला बोलू न देताचं ती दटावतं ओरडली.
" मगं का अशी वागतं होतीसं,जीव जाता जाता राहीलाय माझा तुझ्या अश्या जीवघेण्या वागण्याणे.एवढं काय झालं की अशी एकदमचं शांत होऊन गेलीसं? कोणी आलं तर नाही ना तुझ्या आयुष्यात ?" त्याने काळजावर दगड ठेवतचं हा प्रश्न विचारला.
" नाही रे...मीचं दुवीधेत अडकलेले."
"कायं झालं सांगशीलं? " त्याच्या असा हळुवार प्रश्न आणि तीला राहावलचं नाही.
"श्री माफ कर रे मला खरचं.तु मला समजत होतासं तशी मी नव्हतेचं रे.माझं मन रमत नव्हतं म्हणून तुझ्याशी बोलायचे.मला उदास वाटलं की तुला फोन करायचे.तुला वाटतं होतं की तु असा रिकामा घरच्यांच्या जीवावर जगणारा, ऐतखाऊ मुलगा आणि तरिही मी चांगली आयटी इंजिनीयरींगला असलेली तुझ्याशी मनमोकळेपणाने बोलते.तुझ्यासाठी मी सर्वस्व बनत चाललेले पण माझ्या मनात तसं काहिचं नव्हतं.मी फक्त माझ्या इमोशनल रिकव्हरी साठी तुझा उपयोग करतेय असचं वाटायचं मला.म्हणजे आताच्या भाषेत फक्त वेळ घालवण्यासाठीचं साधनं! पण तु मात्र गुंतत चाललेलासं.एकतर तु बारावी नापासं झालेला, त्यात दोन वेळा री एक्झाम देऊनही तुझे विषय सुटले नव्हते.घरचे ,नातेवाईक,मित्र सगळेचं दुरावलेले आणि त्या परिस्थितीत ही मी तुझ्याशी बोलतं होते.माझ्या बोलण्याचा प्रभाव असं म्हणतोस तू किंवा माझ्या तुझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेचं तु बारावी पास होऊन स्पर्धा परीक्षा देऊन नंबरात ही आलासं.
लीस्ट लागली.तु सिलेक्ट झाला होतासं.पहील्याचं प्रयत्नात तहसीलदार पदी निवड!ही न्यूज तु पहीली मला सांगितली होतीसं आणि त्यानंतर तुझ्या घरी! किती आनंदी होतास तू.फोनवर कितीतरी वेळ हे फक्त तुझ्यामुळे झालं.तु होतीस म्हणून आज मी इथवर पोहोचलो.याचं श्रेय तुलाचं जातं.तु आहेस म्हणून...प्रत्येक वाक्यात माझ्यासाठीचं कौतुक डोकावतं होतं.पण त्यावेळी माझं मन मात्र कुचंबल.तु एवढं भरूभरून माझ्याबद्दल बोलतं होतासं तेवढी खरचं पात्र होते का मी त्या कौतुकासाठी?तुला सांगू मी जेव्हा माझ्या दुःखी कोषातून बाहेर असायचे, नॉर्मल असायचे तेव्हा मला तुझ्यासोबत बोलतो याची किळसं वाटायची.स्वतःचीचं घृणा वाटायची.तु बारावी नापास आणि मी आयटी च्या नामांकित कॉलेजमध्ये रँकर! काय म्हणून आपणं बोलतं असू?पण जेव्हा दुःख हावी व्हायचं तेव्हा आपोआप तुचं समोर दिसायचासं.त्यादिवशी मला जाणवलं तु माझ्यातं पुर्णपणे गुंतलायसं आणि मी तुझ्या भावनांचा फक्त आणि फक्त फायदा घेतीये.माझ्या दुःखी वेळेत स्वतःला सावरण्यासाठी म्हणून फक्त तुझा उपयोग करतेय.माझी मलाचं लाज वाटू लागली.तुझ्याशी फोनवर किंवा मेसेजवर बोलायचीही हिंमत होईना.म्हणून..."
" म्हणून टाळत होतीसं हो ना? " त्याचा दुखरा आवाज.
" श्री...मी... "
" नको मुकु!समजलो मी.मला राग नाही आला तुझा.फक्त वाईट वाटतयं की मी तुला माझ्या हृदयात अगदी वरच्या स्थानी स्थान दिलं पण असो माझचं नशीब फुटकं...काळजी घे.कधीही काही गरज भासली तर निःसंकोच फोन कर.मी तुझ्यासाठी नेहमीचं अव्हेलेबल असेन "तो पुन्हा केविलवाणा हसला.
" श्री, ऐक ना!" ती
" हं ऐकतोय "
" असचं कायमं माझ्यावर प्रेम करशीलं?"
" शेवटच्या श्वासापर्यंत मुकु! तुचं माझी सर्वकाही होतीस आणि राहशीलं! "
" लग्न करशीलं माझ्याशी?"
" मुकु तु हे... "तो गडबडला.ती अचानक असं बोलेलं, त्याला काही समजलचं नाही पटकनं.
" बोल ना लग्न करशील माझ्याशी?तुझ्या नावाने सात जन्मासाठी वडाला फेर्‍या मारायच्या आहेत.जेव्हा तुझी कदर नव्हती तेव्हा काही उमगलचं नाही रे पण जेव्हा तुझ्यापासून दुर जायचा प्रयत्न केला तशी अजूनचं तुझ्याजवळ खेचली जाऊ लागले.जीथे तीथे तू आठवाचासं.बोलायचं नाही तुझ्याशी असं बजावलं होतं मनाला पण नाही रे जमलं.तु फोन करेपर्यंत हुरहुर लागून राहायची.तुझा फोन आला की हातातलं काम सोडून फोन उचलायला धावायचे.पण तुझा आवाज ऐकला की ते सारं आठवायचं आणि मगं पुन्हा शांत होऊन जायचे.पण आता समजलेय, मी ही नाही राहू शकत तुझ्याशिवाय.तुचं माझं आयुष्य बनला आहेस. प्लिज् नाही म्हणू नकोस! " ती अगदी कळवळून बोलत होती.
" मूकु...मुकु यार तुला कल्पना नाही.यार मी आनंदाने वेडा होईन.आय लव्ह यू मुकु...आय...आय जस्ट लव्ह यु! " त्याच्या बोलण्यातुनचं त्याचा आनंद ओसंडून वाहत होता.
"लव्ह यू टू श्री! " तिनेही काहीसं रडतं काहिसं हसतं संमिश्र भावनांनी प्रत्युत्तर दिलं.


© बोलक्या भावना