...

5 views

जीवन हा एक सुंदर प्रवास...!
आपल्या मनात जीवन कदाचित एक धावती रेस, मला हे शिकायचंय, मला ते शिकायचंय, कदाचित मला हे बनायचंय, मला ते बनायचंय, ह्याच्या-त्याच्या सारखं बनायचंय, हिच्याशी लग्न करायचंय, त्याच्याशी लग्न करायचंय, मला मोठा बंगला-गाडी घ्यायचंय, मला असं करायचंय, मला तसं करायचंय...

बाप रे....! किती स्वप्न पाहतो ना आपण.....! रोज नवनवीन अपेक्षा आपल्या जीवनात एन्ट्री मारत असते... बरोबर आहे, अगदी बरोबरचं... कारण, आपल्या जीवनाचा तो भाग आहे. अपेक्षा, स्वप्ने नसतील तर आपण पुढं कसं जाणार?? बरोबर न??

बर ते जाऊद्या, मला एक सांगा, हे जीवन नेमकं काय आहे हो?? आणि मरणाच्या आधी अश्या आपल्या अपेक्षा तरी किती आहेत?? माझा हा अभ्यास राहिला, तो अभ्यास राहिला, माझा हा विषय गेला, माझी नोकरीचं सुटली, मला हे चांगलं जमलं असतं; पण गेलं, माझं ना काहीचं खरं नाही... असा विचार, असे प्रश्न दिवसातून कुणाला ना कुणाला येऊन भेटत असतील, आणि तिथचं येऊन एक उदासीचं लोटांगण घालत असतील... बर, ते उदासीचं लोटांगण घालतातचं, पण आपण स्वत: ना त्याला इतकी मिठी मारून घेतो कि, फक्त दुसऱ्याचा विचार करतो... बाप रे...! लोकं काय म्हणतील, मी नापास झाले?? आई ग.. मी काय करू, माझी नोकरी गेली?? माझं लग्नचं मोडलं, समाज काय म्हणेल?? आणि हेच ते लोटांगण आपण इतकं जवळ करतो कि, जीवनातत्या क्षणी, त्या हारलेल्या क्षणी देखील आपण किती शिकलो?? आपण काय अनुभव घेतला?? आपण त्या गोष्टी करताना काय आनंद घेतला?? सगळंच विसरतो ना... हो ना.. सगळंच विसरतो.. आणि फक्त उदास राहून रडणे, किंवा आत्महत्येचा विचार तर मनात येतो, नाहीतर मी का उगीचचं का जन्माला आलो|आले ?? असा विचार करतो.. करतो कि नाही?? आता सगळेचं असे असत नाही.. पण, थोडा विचार तर सगळेच करतात..

थोडा विचार करा, जीवन काय वाटतं तुम्हाला?? एक परीक्षा?? स्पर्धा?? कि नुसतचं आलोय, आणि आता जायचं पण आहे??

मला काय वाटतं सांगू?? खरचं सांगू??

मला ना, जीवन हे एक सुंदर अनुभवांचा एक प्रवास वाटतो.. ज्यात काही अनुभव तर वाईट तर असतात, पण ते या सुंदर ठरवलेल्या प्रवासात, नदीच्या पाण्यात कचरा बनत नाही, तर त्या कचऱ्याला आड होतात, त्या कचऱ्याला बाहेर फेकून देणारे, त्यातून उत्तम घटक घेणारे प्रवासी दिसतात... म्हणजे कसं पहा हा... त्या प्रत्येक अन्नाचा, जे तुम्हाला जीवापाड आवडत असतं, त्याचा तुम्ही कसा हळू-हळू, अगदी चवीने, आनंदाने, त्याचे प्रत्येक ना प्रत्येक छोट्या कणांचा आस्वाद घेता.. घेता कि नाही?? तसचं जीवनाच्या प्रवासातील प्रत्येक गोष्टीच्या कणा-कणांचा आस्वाद घ्यायला शिका कि, अगदी अपयशाचा देखील... तोही आनंदानेचं.. कारण त्या प्रत्येक कणांतून तुम्ही काही ना काही घेतलेलं असतं, ज्याचा अनुभव, ज्याचा आनंद कदाचित तुम्ही नाहीसा करतात त्या अपयशामागे.. तुमचं अपयश तुम्हाला जास्त केव्हा अपयश वाटतं माहित आहे?? जेव्हा तुम्ही स्वत: दुसऱ्यांसोबत तुलना करत असतात.. मान्य आहे, स्पर्धा आवश्यक आहे, पण कुणाशी?? स्वत:शीच ना... जगण्यातला आनंद या सारखं यश या जगात कुठेही नसेल हो.. कारण यात तुम्ही हारले जरी असाल तरी त्याचा आनंद कधीचं कमी होत नाही.. या जगण्याच्या अनुभवांत तुम्ही नेहमी प्रथम स्थानावर असाल.. यात कुणी कुणाला जिंकूही शकत नाही, आणि हारूही शकत नाही...

म्हणून निराश मन केलेले असेल कोणत्या गोष्टीने, तर झटका त्याला आणि पुन्हा आनंदाने त्या प्रवासाला सुरुवात करा... आपले यश-अपयश जर आपण नाही ठरवणार तर काय दुसरे ठरवणार?? तुलना केली तर नेहमी अपयशचं वाटेल कदाचित.. स्वत:वरचा आत्मविश्वास आणि या जगण्याची कला स्वत: निर्माण करा, त्याला योग्य वळण द्या, आणि याचं जीवनाला एक अनुभवांचा प्रवास माना... लक्षात ठेवा, प्रत्येक क्षणांतील, प्रत्येक कणांचा आस्वाद घ्यायचं मात्र विसरू नका हा....

मग, काय वाटतं जीवन???


© yogi