...

8 views

बदल : आवश्यकता आणि मानसिकता
    
     अनेक वर्षे कारखाना चालवून वयोमानामुळे थकलेला मालक, आपल्या परदेशातून आलेल्या तरुण मुलावर कारखाना सोपवतो . नव्या उमेदीचा , उच्च शिक्षित मालक मिळाल्यामुळे नोकरदार मंडळी खुश होतात. आपल्याला कर्तृत्व दाखविण्याची संधी मिळणार म्हणून मुलगा आनंदतो.  मालकही हे चित्र पाहून,  आराम मिळणार म्हणून ,समाधानाने , स्व खुशीने दुरच्या जागी  मनः शांतीसाठी निघून जातो.  win win situation आहे. वडिलांनी कारखान्याची घडी    आधीच व्यवस्थित बसवली होती. अनुशासन आणि सुव्यवस्था नांदत होती . आपले कर्तृत्व दाखविण्यासाठी आतुर असलेल्या  मुलाला यात काही challenging /आव्हान वाटत नाही. कामगारदेखील रटाळपणाला कंटाळलेले  आहेत .  त्यांनाही बदल हवा आहे . परदेशात प्रयोग केले जातात त्या धर्तीवर, कामगार आणि नवा मालक यांची सामंजस्यपूर्ण चर्चा होऊन , कारखान्यात बदल घडवावा असे ठरते.   त्यानुसार ,  काही नवीन यंत्रे आणून इच्छुकांना तंत्रशिक्षण  देण्यात येते . दैनंदिन तेच तेच काम करून कंटाळलेल्या एका समूहाला अंतर्गत डिपार्टमेंट  बदलून आवडीच्या डिपार्टमेंटला जाण्याची परवानगी मिळते . उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि टारगेट अचिव्ह करणाऱ्याला प्रलोभने पगार वाढीची हमी तरुण मालक देतो . टीम लिडर , टीम मेंबर्सना टीम बदलण्याची संधी मिळते . शिस्त ,  नियम, रटाळपणाला कंटाळलेल्या कामगारांत नवीन ऊर्जा संचारते. अपेक्षेनुसार आता उत्पादनामधील quality आणि quantity वाढ होईल ,असे अनुमान करणाऱ्या नवीन मालकाला मात्र विपरीत अनुभव येतो . मालाच्या संख्यात्मक  आणि गुणात्मकतेमध्ये  घट होते .  उत्पादन प्रक्रियेसाठी लागणारा वेळही वाढतो .कामगारांमध्ये असमन्वय होऊन असंतुष्टी वाढते ,असे का?
     एक काल्पनिक कथेतून बदल आवश्यकता आणि मानसिकता या विषयी मी माझी अभिव्यक्ती प्रगट करीत आहे. परिवर्तन हा जीवनाचा स्थायीभाव आहे . व्यक्ती अथवा यंत्रणेमधील अनावश्यक, कालबाह्य बाबी सुधारण्यासाठी आणि प्रगतीसाठी परिवर्तन अनिवार्य आहे. असंतुष्टीकारक घटक बदलाद्वारे दूर होऊ शकतात. जीवनात सारं काही मधुर, सुंदर आणि स्थिर असेल तर मनुष्यातील क्षमता बोथट होतील . आव्हाने...