...

4 views

भावनिक बुद्धीमत्ता

मध्यमवर्गीय बंटी पदवीदान समारभातून सुवर्ण पदक ,नव्या डिग्रीचा कागद आणि मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास घेवून बाहेर पडतो .कुुशाग्र बुुद्धिमत्ता लाभलेेल्या बंटी कडूूून सर्वांच्या खूप अपेक्षा असतात .बंटी पैसा ,नाव, यश मिळवणार ,अशी सर्वांची खात्री असते .झालेही तसेच .त्याची गुणवत्ता पाहून मोठया कंपनी मधून जॉब ऑफर येते .मुलाखतीच्या रांगेत दिखाऊ ,आणि बढाई खोर उमेदवारांच्या गप्पा ऐकून बंटीचा आत्मविश्वास आणि हातातील फाईल दोन्ही गळून पडतात.
पदक, डिग्रीची फाईल आणि बंटी सर्वांवर काजळी चढत आहे ,असे पाहून त्याचे वडील चार -दोन ठिकाणी शब्द टाकून ओळखीत चिकटवतात. इतर सहकाऱ्यांच्या वाउचर आणि बिलामधील दोष आणि त्यामागची अश्रू आणणारी कारणे, यांचा मेळ न घालता आल्यामुळे बंटीची बॅलन्स शीट आणि जीवनाचा हिशोब चुकतो . भावूक कारणे देऊन उशिरा आलेल्यांमुळे हजेरी पुस्तकही बिघडते.
बंटीची आता out door म्हणजे कारखान्यात रवानगी होते. तेथील कामगारांची दुःखे ऐकून हललेला बंटी मजदूर- मालक सभेत जोरदार भाषण ठोकतो . दुसऱ्या दिवशी कामावर निघण्याआधी शिपायकरवी एक लखोटा बंटीच्या हातात पडतो.
बंटीला आईचे दागिने विकून नवीन व्यवसाय सुरू करून दिला जातो. मालाच्या डिलिव्हरीनंतर पैशांच्या वसुलीला गेलेला बंटी, घशात आवंढा घेऊन परत येतो. या साऱ्या संघर्षात सकारात्मक बाब म्हणजे शेजारची निमा .भावना व्यक्त करण्याचे त्याचे विश्वासाचे ठिकाण...