...

7 views

Mission AK ( One side प्रेमाच top secret mission) Part-3
कारण तीचा जेवण करण्याचा स्पीड हा गोगलगाय पेक्षाही स्लो होता.त्या मुळे जो पर्यंत तीच जेवण होत नाही तो पर्यंत मी काहींना काही खातच रहात. तीच्या नादान पोट भरून गेलय हे पण मला कळत नव्हतं.येवढे जेवल्या मुळे मला रोजच आॅफिस मध्ये गेल्यावर झोप लागत. एक दिवस असच मी आणि माझे सीनीयर सर लन्च साठी कॅन्टीन मध्ये आलो होतो तो पर्यंत मी तीच्या बद्दल त्यांना काहीच सांगीतले नव्हते. त्या दिवशी ती लंन्च साठी ठोडी लेट झाली आणि आम्ही लंन्च करून लस्सी पिन्यासाठी अॉफिसच्या बिल्डींगच्या बाहेर गेलो होतो पण माझ काही मन लागत नव्हत कारण तीच दर्शन झालं नव्हतं. त्या वेळी माझ्या मनात विचार आला जर मला हे मिशन पुर्ण करायचं असेल तर कुणाची तरी साथ हवी होती.मी माझ्या सिनीयर सरांना बोल्लो सर चला कॅन्टीन मध्ये तुम्हाला काही तरी दाखवायचे आहे.अस बोल्या वर सरांना समजले होते मला काय दाखवायचे आहे ते लगेच बोलून गेले 'कोणती पोरगी आवडली का.. हे ऐकताच मी हसलो आणि बोललो चला. त्या नंतर सर आणि मी कॅन्टीन मध्ये गेलो.तीथे त्या ४-५ ही मुली जेवण करत होत्या. सरांना मी बोललो त्या ज्या मुली जेवण करत आहे ना त्यातली कोणती असले सरांनी सगळ्यान कडे बोट दाखवल पण तीच्या कडे नाय दाखवलं कारण सरांना त्या वेळी वाटल असाव की याचं तोंड कस आणि ती किती भारी तरीही ते बोलले भारी एक नंबर.. आणि त्या दिवशी पासून सुरू झाल मिशन AK...to be continue
© All Rights Reserved