...

4 views

शिवविचार प्रतिष्ठान
#२४ जानेवारी १६६७
छत्रपती शिवाजी महाराजांनी १२ मावळ मधील कानद खोरे
मावळातील वतनाचा तंटा मिटवला.
मरळ घराण्याकडे पुन्हा वतनदारी.
कानद मावळ १२ मावळातील सहावे.
या भागातून कानंदी नदी उगम पावते आणि वाहते म्हणून त्याला कानद
मावळ म्हणतात.
कानंद मावळाच्या सीमेवर तोरणा हा किल्ला आहे.
कादवे व भट्टीची ह्या खिंड, तर देवराई अशी ठिकाणे आहेत.
#Ek_aathavan_shivrayanchi
#२४ जानेवारी १६८०
सुरतकर इंग्रजांनी इस्ट इंडिया कंपनीला लिहिलेले पत्र
पिढ्यान् पिढ्या स्थिरावलेल्या व प्रचंड लष्करी शक्ती असलेल्या शजूंना
शिवाजीमहाराजांनी स्वप्रतापाने एवढे जेरीस आणले की, नुसते त्यांचे
नाव ऐकताच या शत्रूचा थरकाप उडत असे.