...

48 views

मनाने स्वावलंबी...
आयुष्य देवाने, वेळेने आणि निसर्गाने सगळ्यांना समान दिले आहे... हे त्रिवार सत्य आहे. पण... नेमका खडा कुठे पडला ? देव तर चुकणारच नाही... वेळ ही आव्हानात्मक भूमिका बजावत असते, पण इथे अन्याय करणारच नाही... आणि निसर्ग तो तर आपल्यालाच निर्भिड बनवतो, आलेल्या संकटांवर मात करण्यासाठी, मग तो ही भेदभाव करणारच नाही... हे सगळे तर जगायला बळ देतात प्रत्येक जीवाला... !!!
मग चुकला कोण किंवा चुकतो कोण किंवा चुकणार आहे कोण ???
ते पण एक जीव आहेत...
तिला ही गळ्यात डोरले आणि बोटात जोडवे घालून चार चौघीत संसाराच्या गप्पा माराव्या वाटतात...
तिला ही मातृत्व असावं वाटतं... त्यालाही बाबा हे शब्द स्वतःच्या मुलांच्या तोंडून ऐकायचे असतात...
त्याला ही रनिंग मधे भाग घेऊन जिंकावं वाटतं... तिला ही स्वरक्षणासाठी कराटे मधे भाग घेऊन स्वतः स्वतःसाठी स्वतःचा वेळ प्रसंगी जीव वाचवू शकते, ही आवड म्हणण्यापेक्षा आजची गरज म्हणून रक्षण म्हणून शिकायची इच्छा असते...

ती स्त्री असली तरी ! तिने ठरवले तर !
तिने पक्का विचार केला तर ! ती काहीही करू शकते...........!
पण कधी,,, जर ती शरीराने अपंग नसेल तरचं... कारण तिची खुप इच्छा आहे, भावना आहेत, जीव गुदमरतो, हात पाय स्थिर बसू देत नाहीत...
खरचं का बरं तिच्याच वाट्याला ते दुःख... काय केले तिनेच असे "वेगळे जागा वेगळे" म्हणून ती ही अशी अपंग जन्मली... का ? पण का ?
असा अन्याय का ?
असा भेदभाव का ?

खूप वाईट वाटते मला personally की मग देव, वेळ आणि निसर्ग यांनी सगळ्यांनाच अपंग करायचे ना... आयुष्यातील ज्या आनंदाच्या किंवा निसर्गत: लाभलेल्या, मिळालेल्या, भेटलेल्या गोष्टी आहेत, ज्याचा सगळेजण लाभ उपभोग घेतात. त्या गोष्टी, ते क्षण, ते सुख का या जीवांना भेटणारं नसतं, नाही किंवा नाही'च'...
का विचार केला नाही, करत नाही किंवा करणार नाही नियती, की जे शरीराने अपंग आहेत त्यांनाही मन, भावना, आशा, जिद्द, उत्साह, धडपड आणि उडण्यासाठी इच्छा नावाचे पंख आहेत. तरीही ते उडू शकत नाहीत...
काहीतरी मोठा अपराध केल्यासारखा स्वतःला दोष देत आयुष्य जगत ! तेही खूप समाधानाने जगत ! स्वतःच्या शरीरातील एक व्यंग त्याला स्वीकारून खूप आनंदाने जीवन जगत आहेत...
"ते शरीराने परावलंबी आहेत, पण ते मनाने दुबळे नाहीत... तर ते खूप खंबीर, भक्कम स्वाभिमानी आणि स्वावलंबी आहेत..."
"l proud of you handicapped..."🙏

{POURNIMA}🖊️