live in or leave it
Live in or leave it
स्वतः च अस्तित्व ,करिअर /भवितव्य निर्माण करण्यासाठी small town सोडून शहरांकडे येण्याची ओढ तशी जुनीच.पण जुन्या काळी मात्र थोडंसं बस्तान बसल्यावर ‘कुटुंब’किंवा ‘ मंडळी’ गावाकडून आणल्यावर सेटल झाल्याचा आणि जन्म सार्थकी लागल्याचा आनंद लाभायचा. त्यातही चाकरमान्याचा अर्धा जीव गावाकडच्या मातीत रुजलेला. भवितव्यापेक्षा पोटाचा प्रश्न मार्गी लागला हेच खरं कर्तृत्व वाटायचं. आता life style बदलली आहे.नैतिक मूल्यांपेक्षा पैशाचं मोल वाढले.
पदव्या आणि टॅलेंट यांना शहरातच काय तो न्याय मिळेल, शहरात आपला गॉड फादर वेटिंग आहे अशी धारणा घेऊन ,हे स्थलांतरित पक्षी स्वप्नांच्या मुक्त नभातुन ,शहरांतल्या छोट्या खोल्यांमध्ये adjust होऊ पाहतात. जागेचा,जेवणाचा ,जीवनाचा संघर्ष. स्वप्नाळूपणाला झगमगती दुनिया, मोठी पॅकेजेस यांची भूल पडते. स्वतंत्र...