...

8 views

आज तू मला पुन्हा भेटलीस
आज तू मला पुन्हा भेटलीस

आज तू मला पुन्हा भेटलीस
सुटला माझा आठवणींचा बांध,
करून विचारपूस माझ्या आयुष्याचा केलीस ग सखे माझ्या मनांत आठवणीची रांग...

तुझ्या भेटण्याने वसंत फुलला राणी कारण तु पुन्हा भेटलीस...

वाटतं सखे करुन तुझी आठवण झुरून जावं तुझ्या प्रेमात पण त्या प्रेमासाठी पुन्हा भेटशील....

शुक्रतारा पाहुन वाटतं कधी कधी यासारखी तु दीसावी गं सजनी
पण त्या तार्याची घेतो मी साक्ष तु पुन्हा भेटशील

तुझ्या आठवणीत पडेल चांदण्याचा पाऊस त्या पावसात भीजायला पुन्हा भेटशील

आठवण तुझी माझी ती गं पवनाची झुळुक,आठवणीची आठवणं काढायला पुन्हा भेटशील

तुझ्या प्रेमाच्या फांदीवर मी गं कसा झुरणार,पुन्हा भेटण्याच्या त्या आशा कधी गं जागवणार

तुझ्या त्या पाणावलेल्या नयनात सखे मी गं कसा दिसणार, तुझ्या भेटीशीवाय मी गं वसंताशी कसा बोलणार

शेवटच्या भेटीची देत वेडी साक्ष गुलमोहर सुध्दा फुलेल बगुन
तुझा तीरपा कटाक्ष

नको छळु सखे होईल माझी काळरात्री,म्हणुन म्हणतो सजने तुझ्या वेड्या आठवणीचे माजते काहुर

तु पुन्हा भेटशील

-संदीप जाधव पाटील